बीड

पौळाचीवाडी येथे पाण्याची तिव्र टंचाई.. तालुक्यातील महिला नागरिकांना पाण्यासाठी भटकंती

 पौळाचीवाडी येथे पाण्याची तिव्र टंचाई.. तालुक्यातील महिला नागरिकांना पाण्यासाठी भटकंती
कोळगाव, दि.२८ : – गेवराई तालुक्यातील अनेक गावांत उन्हाळ्याचे दिवस सुरू असल्याने तीव्र पाणीटंचाई सुरू झाली आहे. यामध्ये पौळाचीवाडी येथे पाण्याची तिव्र टंचाई असुन येथील महिलांनी पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. शासकीय पाणीपुरवठा तसेच जलजीवन योजनेवर लाखो रुपये खर्च करून ही जनतेचे हाल होत आहे. सध्या मार्च एप्रिल महिन्यात पाण्याचे स्रोत आटले असून शासनाने पाणी टँकरने पाणी पुरवठा करण्यात यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शरद जाधव यांनी निवेदनाद्वारे केली.
     गेवराई तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये पिण्याच्या पाण्याची तिव्र टंचाई जाणवु लागली असुन भटकंती करून देखील पाणी मिळत नसल्याने नागरीकांचे हाल होत आहेत. यामध्ये पौळाचीवाडी ग्रामपंचायतीमधील लोकांना पाणी टंचाई ची झळ बसत आहे. ग्रामपंचायत प्रशासन अन् ग्रामसेवकाकडून पाणी नियोजन होत नाही यामुळे पाणीटंचाई जाणवत आहेत . त्याचबरोबर गावात शासनाच्या पाणीपुरवठा च्या विविध योजना बंद पडल्या आहेत. त्याचबरोबर भाजप सरकारचे जलजीवन पाणीपुरवठा योजना कोटीची कोटी रुपयांची पौळाचीवाडी गावांसाठी मंजूर करण्यात आली. पण संबंधित योजनेचा बट्ट्याबोळ झाला आहे. गुत्तेदाराने नियमित अनदर्जेदार काम न केल्यामुळे आणि ही योजना फायद्याची नसल्याचे गावकरी स्पष्ट सांगत आहे. गावामध्ये जलजीवन योजना हि फक्त नावापुरतीच असून त्याचा गावकर्यांना कसलाच उपयोग होत नाही. ती योजना सुरळीत चालू असती तर त्याचा लोकांना फायदा होऊन हाल झाले नसते. शासनाने एवढा निधी खर्च करून त्याचा गावासाठी कसलाच फायदा नाही. पाण्याच्या कुठलाही स्रोत जवळपास उपलब्ध नसले कारणाने लोकांना रानावनातून भटकंती करावी लागते लोक सायकल बैलगाडी या‌द्वारे दूर दूर वरून पाणी आणतात लोकांच्या अशा प्रकारे हाल होत आहेत जर शासनाने लवकरात लवकर टँकर सुरू केले हाल थांबतील. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असे निवेदन गेवराई गटविकास अधिकारी, तहसीलदार, बीड जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
   आ. विजयसिंह पंडित यांनी पाणीटंचाई संदर्भात आता नियोजनही बैठक घ्यावी – जयदीप गोल्हार
      टँकरचे प्रस्ताव मंजूर करण्याचे आदेश शासनाने तहसील आणि पंचायत समितीला दिलेले आहे. पण गेवराई तहसील कार्यालयाच्या आणि गटविकास अधिकारी यांच्या दुर्लक्षामुळे तात्काळ टँकर मंजूर होत नाही हे पौळाचीवाडी गावावरुन दिसून येत आहे. पण यामुळे गावकर्‍यांना दूरवरून पाणी आणावे लागत आहे. तसेच मौजे पौळाचीवाडी या गावासारख्या तालुक्यात अनेक गाव वाडी वस्त्यांवर पाणी टंचाईच्या झळा बसत आहे यासंदर्भात ना गाव कारभारी आणि गेवराई गटविकास अधिकारी, तहसीलदार यांना सोयर सुतक नाही. तरी मतदारसंघातील जनतेला पाणीटंचाई नियंत्रण व व्यवस्थापन करण्यासाठी लोकप्रतिनिधी आमदार विजयसिंह पंडित यांनी पंचायत समितीमध्ये बैठकीमध्ये आता पाणी नियोजनही बैठक लावावी. गाव गावातच पाणी अहवाल घेऊन पाणी टँकर सुरू करण्यात
करावे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष जयदीप गोल्हार यांनी केली.
Back to top button