📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

ठेवीदारांच्या रेट्याने ज्ञानराधावर एमपीआयडी प्रस्ताव मंजूर : प्रा.सचिन उबाळे

ठेवीदारांच्या रेट्याने ज्ञानराधावर एमपीआयडी प्रस्ताव मंजूर : प्रा.सचिन उबाळे

दोन वर्षांपासून सुरु असलेल्या ठेवीदारांच्या आंदोलनाला यश

बीड (प्रतिनिधी) :-जिल्ह्यातील दिवाळखोरीत निघालेल्या मल्टिस्टेट पैकी सर्वाधिक ठेवी असलेल्या ज्ञानराधा मल्टिस्टेटवर अखेर एमपीआयडी मंजूर केल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात केली. दरम्यान केवळ ठेवीदारांच्या रेट्याने शासनाला एमपीआयडीचा प्रस्ताव मंजूर करावा लागला असून ठेवीदारांच्या मागण्यांसाठी दोन वर्षांपासुन सुरु असलेल्या आंदोलनाला यश आले आल्याचे ठेवीदार कृती समितीचे राज्य समन्वयक तथा स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. सचिन उबाळे यांनी म्हटले आहे. व
जिल्ह्यातील ज्ञानराधा मल्टीस्टेट, साईराम मल्टीस्टेट, राजस्थानी मल्टीस्टेट (पतसंस्था), जिजाऊ मल्टीस्टेट, शुभ कल्याण मल्टीस्टेट, मातोश्री अर्बन, लक्ष्मीमाता अर्बन, मराठवाडा अर्बन (माजलगाव)आर्थिक दिवाळखोरीत निघालेल्या आहेत. यामध्ये मराठवाड्यातील लाखों ठेवीदारांच्या ठेवी अडकल्या आहेत. ज्ञानराधा मध्ये राज्यभरातील सर्वाधिक ठेवीदारांच्या ठेवी आहेत. ठेवीदारांच्या ठेवी परत मिळाव्या यासाठी ठेवीदार कृती समितीचे राज्य समन्वयक तथा स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. सचिन उबाळे यांच्या नेतृत्वाखाली ारंवार उपोषण, आंदोलने केल्याने बीड पोलिसांनी सुरेश कुटे यांच्यासह जवळपास सर्वच मल्टिस्टेटमधील आरोपींना अटक केली. सर्व आरोपींना अटक करणे हे आंदोलनाचे पहिले यश आहे. ज्ञानराधावर एमपीआयडी दाखल करावा, अर्चना कुटे यांना अटक करावी अशी मागणी सुरुवातीपासून प्रा.उबाळे यांनी लावून धरली होती. यामुळे एमपीआयडीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता. मात्र काही त्रुटी निघाल्याने तो पुन्हा बीड पोलिसांकडे परत आला. या संदर्भात प्रा.उबाळे यांनी पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन त्रुटींची पूर्तता करुन आठ दिवसांत एमपीआयडीचा प्रस्ताव शासनाकडे पुन्हा पाठवावा अशी मागणी केली होती. दरम्यान बीड पोलिसांनी पाठिवलेल्या ज्ञानराधावरील एमपीआयडीच्या प्रस्तावास शासनाने मंजूरी दिली असून या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात घोषण केली आहे. ठेवीदारांच्या रेट्यामुळे शासनाने एमपीआयडी मंजूर केला  असून ठेवीदारांच्या आंदोलनाचे हे दुसरे यश असल्याचे प्रा.उबाळे यांनी म्हटले आहे.
—–
राणे, धस, सोळंके यांचे मानले आभार
दरम्यान ज्ञानराधा व इतर मल्टिस्टेट संदर्भात आवाज उठविल्याबद्दल ना नितेशजी राणे, आ सुरेश अण्णा धस, आ प्रकाश दादा सोळंके,आ नारायण कुचे, आ बबनरावजी लोणीकर, आ मेघना बोर्डीकर यांचे प्रा.सचिन उबाळे यांनी आभार मानले आहे.

Back to top button