बीड

धनगर समाजाचा ६० वर्षांपासूनचा ST आरक्षणाचा प्रश्न अद्याप प्रलंबित – पांडुरंग माने

धनगर समाजाचा ६० वर्षांपासूनचा ST आरक्षणाचा प्रश्न अद्याप प्रलंबित – पांडुरंग माने

सरकारकडून तातडीने निर्णयाची मागणी; राज्यपालांमार्फत केंद्राला शिफारस करण्याचे निवेदन

फडणवीस साहेब, धनगर समाजाचे आरक्षणाचे आश्वासन आठवतेय का?

धनगर ST आरक्षण: ‘धनगड’ची दुरुस्ती करा, आरक्षण द्या!

जामखेड प्रतिनिधी दि. १९ मार्च – महाराष्ट्रातील धनगर समाजाचा अनुसूचित जमाती (ST) आरक्षणाचा प्रश्न गेल्या सहा दशकांपासून प्रलंबित असून, शासन अद्याप ठोस निर्णय घेत नाही, असा आरोप समाजाच्या नेत्यांनी केला आहे. धनगर समाजासाठी ST आरक्षणाची स्वतंत्र मागणी नाही, तर १९५० पासूनच्या यादीतील “धनगड” शब्दाच्या चुकीच्या नोंदीची दुरुस्ती करून शासनाने त्वरित अंमलबजावणी करावी, अशी ठाम भूमिका व्यक्त करण्यात आली.धनगर समाजाच्या वतीने निवेदन
महाराजा यशवंतराव होळकर राज्याभिषेक सोहळा समितीचे सदस्य पांडुरंग माने, विनोद टकले, सचिन टकले यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार गणेश माळी यांच्यामार्फत महाराष्ट्र शासनाला निवेदन देण्यात आले.

राज्यातील धनगर समाजाच्या विविध संघटनांनी आणि प्रतिनिधींनी महाराष्ट्र शासनाला विनंती केली आहे की, त्वरित राज्यपालांमार्फत केंद्र सरकारला शिफारस पाठवून धनगर समाजाला ST प्रमाणपत्र वितरित करण्याचे आदेश द्यावेत.

२०१४ पासून आश्वासन, पण अंमलबजावणी कधी?
२०१४ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्याच कॅबिनेट बैठकीत धनगर समाजाला आरक्षण लागू करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आजही धनगर समाजाला त्याचा लाभ मिळालेला नाही. या पार्श्वभूमीवर, नुकतेच खासदार विशाल पाटील यांनी लोकसभेत हा प्रश्न मांडला.

राज्य आणि केंद्र सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अन्यथा व्यापक आंदोलन छेडले जाईल, असा इशारा धनगर समाजाच्या नेत्यांनी दिला आहे.

Back to top button