बीड

मातृभूमी तर्फे रविवारी वंजारी वधु-वर राज्यस्तरीय परिचय मेळावा 

मातृभूमी तर्फे रविवारी वंजारी वधु-वर राज्यस्तरीय परिचय मेळावा
आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभ
बीड (प्रतिनिधी):- मातृभूमी प्रतिष्ठान संचलित, अखिल भारतीय संत भगवानबाबा वंजारी समाज वधु-वर नोंदणी महासंघ तथा वंजारी विश्व वधु-वर, वंजारी परिवार, वंजारी समाज महाराष्ट्र वार्षीक अंक छत्रपती संभाजीनगरच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा,  18 वा राज्यस्तरीय सर्व शाखीय वंजारी वधु-वर परिचय मेळावा तसेच आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण व इतर क्षेत्रातील गुणवंतांचा गौरव सोहळा रविवार दि.1 मार्च 2026 रोजी सकाळी 10 ते सायं.5 दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन सभागृह, नगर रोड, बीड येथे आयोजित केला आहे. या सर्व कार्यक्रमास समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.संजय तांदळे यांनी केले आहे.
मातृभूमी प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन महंत ह.भ.प.राधाताई महाराज आईसाहेब यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह.भ.प.मोहन महाराज खरमाटे हे असणार आहेत तर प्रमुख पाहुणे म्हणून  मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रमाच्या सकाळच्या प्रथम सत्रामध्ये
 सकाळी 10.30 ते 12.30 या कालावधीत मातृभूमी राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण व विविध क्षेत्रातील गुणवंतांचा गुणगौरव सोहळा संपन्न होणार आहे. त्याचबरोबर सकाळी  पहिल्या सत्रात सकाळी 10 ते 1 या दरम्यान वधू-वर नोंदणी करण्यात येणार आहे. तर दुसर्‍या सत्रामध्ये दुपारी 12.30 ते 1.30 वा. स्नेहभोजन होणार आहे. त्यानंतर दुपारी 1.30 ते 5.30 या कालावधीत वधु-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच वंजारी समाज महाराष्ट्र वार्षिक अंकाचे प्रकाशन याच प्रथमसत्र कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते संपन्न होणार आहे. मातृभूमी प्रतिष्ठान संचलित, अखिल भारतीय संत भगवानबाबा वंजारी समाज वधु-वर नोंदणी महासंघ तथा वंजारी विश्व वधु-वर परिचय मेळाव्याच्या माध्यमातून आतापर्यंत 1550 रेशीमगाठी जुळवून त्यांचे विवाह संपन्न झाले आहेत. तसेच प्रतिष्ठान मार्फत गेल्या 17 वर्षामध्ये विविध क्षेत्रातील जवळपास 2 हजार गुणवंतांचा आतापर्यंत सत्कार केलेला आहे.
तरी वरील कार्यक्रमास समाज बांधव, शिक्षक, गुणवंत विद्यार्थी यांनी मोठया संख्येने उपस्थित रहाण्याचे आवाहन संयोजन समितीच्यावतीने डॉ.संजय तांदळे, प्रा.ज्ञानेश्वर वाघ, रामदास हांगे, इंजि.उत्तमराव मिसाळ, प्रा.डी.जी.तांदळे, बाबा जायभाये, बाजीराव ढाकणे, पांडुरंग जायभाये, प्रा.बाळासाहेब नागरगोजे, लक्ष्मण चाटे, प्रा.बिभीषण चाटे, राजेंद्र तिडके, मोहनराव सिरसाट, गणेश सानप, रवींद्र मुंडे, प्रा.अशोक नागरगोजे, श्रीराम ढाकणे, संतोष गर्जे, आत्माराम वाव्हळ, उध्दव लाड आदींनी केले आहे.
Back to top button