संजय काशिद व रोहिणी काशिद यांच्या पुढाकाराने जामखेडमध्ये गौरी-महालक्ष्मी सजावट स्पर्धा

संजय काशिद व रोहिणी काशिद यांच्या पुढाकाराने जामखेडमध्ये गौरी-महालक्ष्मी सजावट स्पर्धा
महिला शिवजन्मोत्सव समितीचा उपक्रम ; जामखेडकरांसाठी अनोखी संधी
जामखेड – महिला शिवजन्मोत्सव समिती, जामखेड यांच्या वतीने गौरी-महालक्ष्मी सजावट स्पर्धा २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. अध्यक्षा सौ. रोहिणी संजय काशिद व भाजपा तालुका अध्यक्ष मा. संजय (काका) काशिद यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा ३१ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर दरम्यान होणार आहे.
स्पर्धकांनी आपले नाव, पत्ता, मोबाईल नंबर, तसेच सजावटीचा व्हिडिओ आणि फोटो 94209 94377 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर पाठवावेत. व्हिडिओ HD दर्जाचा असावा व दोन मिनिटांपेक्षा अधिक नसावा. विशेष म्हणजे, स्पर्धा पूर्णपणे मोफत असून जामखेड नगरपरिषद क्षेत्रातील नागरिकांना सहभागी होता येणार आहे.
स्पर्धेत प्रथम क्रमांक विजेत्यास सोन्याची नथ व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांक विजेत्यास ३२ इंच एलईडी टीव्ही व सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांक विजेत्यास पैठणी व सन्मानचिन्ह, तर चतुर्थ क्रमांकासाठी तीन बक्षिसे व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहेत. परीक्षकांचा निर्णय अंतिम मान्य केला जाईल. पारंपरिक, ऐतिहासिक तसेच देशभक्तीपर सजावटींना(उदा.मिशन सिंदूर) विशेष प्राधान्य दिले जाणार आहे.
दरम्यान, दि. ३० सप्टेंबर रोजी सायं. ७ वा. दुर्गा शक्ती वाहन रॅली काढण्यात येणार असून, त्यानंतर लोहार देवी मंदिर, खर्डा रोड, जामखेड येथे बक्षिस वितरण समारंभ होणार आहे.



