पुन्हा एकदा त्याच जोशात,छत्रपती शिवाजी नगरचा महाराजा या वर्षी १७ फुटांचा.

पुन्हा एकदा त्याच जोशात,छत्रपती शिवाजी नगरचा महाराजा या वर्षी १७ फुटांचा.
बीड रिपोर्टर – गेल्या कित्येक वर्षांपासून शिवराजे मित्रमंडळाचे तरुण बीड शहरात वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करून आपल्या कार्याचा ठसा शहरभर निर्माण करत असतात. याच कार्यक्रमांपैकी एक म्हणजे गणेशोत्सव नेहमीच ऐतिहासिक पद्धतीने पार पडणारा गणेशोत्सव या वर्षी अवाढव्य स्वरूपात पूर्ण बीड जिल्ह्याला पहायला मिळणार आहे.
बीड शहरात यंदाच्या गणेशोत्सवात उत्साहाचा नवा आयाम पाहायला मिळणार आहे. कारण प्रथमच तेलंगणा राज्यातून तब्बल १७ फुटांची बप्पाची भव्य मूर्ती बीडमध्ये येत आहे. या मूर्तीची खास वैशिष्ट्ये म्हणजे तिची कलाकुसर, आकर्षक रंगसंगती आणि आधुनिक डिझाईन.
बीड शहरात यंदा गणेशोत्सवाच्या स्वागताला एक वेगळाच रंग चढणार आहे. तेलंगणा राज्यातून प्रथमच सतरा फुट उंचीची बप्पाची भव्य मूर्ती बीड शहरातील मोरया गणेश मित्र मंडळाच्या छत्रपती शिवाजी नगर चा महाराजा मंडळाकडून आणली जाणार असल्याने शहरात आनंदाचे वातावरण पसरले आहे.या मूर्तीचे आगमन झाल्यानंतर शहरातील गणेश भक्तांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे.
ही मूर्ती खास हाय-फाय डिझाईनमध्ये बनविण्यात आली असून, तिच्या सजावटीसाठी आधुनिक कलाकुसरीचा वापर करण्यात आला आहे. मूर्तीच्या आगमनावेळी ढोल-ताशा,वाजत-गाजत मिरवणूक काढली जाणार आहे.
छत्रपती शिवाजी नगरचा महाराजा या मंडळाचे कार्यकर्ते व नागरिक या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी उत्सुक आहेत. बीडकरांसाठी हा गणेशोत्सव विशेष ठरणार असून, शहरात भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी शहरासह तालुक्यातूनही भाविक मोठ्या संख्येने येतील,अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे. बीडकरांसाठी हा गणेशोत्सव ऐतिहासिक ठरणार असून, “बप्पा मोरया”च्या जयघोषाने संपूर्ण शहर दुमदुमून जाणारा आहे.



