बीड
प्रभाग ३ मध्ये दो कुबेर में एक फकीर रवी जयमल्हार बागल यांना निवडून देण्याचा मतदारांचा निर्धार

प्रभाग ३ मध्ये दो कुबेर में एक फकीर
रवी जयमल्हार बागल यांना निवडून देण्याचा मतदारांचा निर्धार
आ. संदीप क्षीरसागर यांचे बळ पाठिशी असल्याने मतदारांचा प्रतिसाद
बीड दि.१८ (प्रतिनिधी):- शहरातील प्रभाग क्रमांक ३ ची निवडणूक तापली असून, जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. पण दोन कुबेरांमध्ये एक फकीर असा सामना रंगला असल्याने सर्वसामान्य मतदारांनी कुबेरांंना सोडून रवी बागल यांच्या पाठीशी उभे राहून निवडून देण्याचा निर्णय घेतला असल्याने प्रभाग क्रमांक ३ चा निकाल धक्कादायक असणार असे चित्र आहे. तर शहरातील जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी नेहमी तत्पर असलेले आ. संदीप क्षीरसागर यांचे बळ रवी बागल यांच्या पाठीशी असल्याने मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, येथे केवळ रवी बागल यांची हवा निर्माण झाली आहे.
बीड शहरातील जनतेचा जिव्हाळ्याचा आणि अत्यंत गरजेचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी माजलगाव बॅकवॉटर आणली असल्याने शहराला मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळे शहराची पाण्यासाठीची भटकंती टळली आहे. परंतु या योजनेला बरेच वर्ष झाल्याने जलवाहिनीला गळती लागल्याने पाण्याची नासाडी होत होती. यामुळे शहराला २० ते २२ दिवसाला पाणीपुरवठा करण्यात येत होता. यामुळे शहराची तहान भागत नव्हती यावेळी सर्व पुढारी खूप उष्णता आहे म्हणून एसीत बसून होते. तेंव्हा में महिन्याच्या रखरखत्या उन्हात आ. संदीप क्षीरसागर हे आडराणात उभे राहून फुटलेली जलवाहिनी दुरुस्त करुन घेत होते. त्यांच्या या कामामुळे जे चार महिन्यांत न होणारे काम काही दिवसांत करुन घेतले. २२ दिवसावरचा पाणी पुरवठा ८ दिवसांवर आला. यामुळे शहर वासियांना मोठा दिलासा मिळाला हे मतदार कसे विसरतील, यावर न थांबता गल्लीबोळात फिरुन नळाला पाणी योग्य दाबात येत आहे का? याची पाहणी केली. कोणत्या भागात कधी पाणी येणार याची माहिती देणारे राज्यातील एकमेव आमदार संदीप क्षीरसागर आहेत. शहराती कचरा उचलण्यासाठी पाहटे शहरात फिरणारा आमदार म्हणून प्रश्न विचारला तर आ. संदीप क्षीरसागर यांचे नाव समोर येते. तसेच यावर्षी पावसाळ्यात सर्वत्र हाहाकार माजला होता पण आ. संदीप क्षीरसागर यांच्या दुरदृष्टीमळे बिंदुसरा नदीतील कचरा उचलून नदीचे खोलीकरण आणि पात्र विस्तारीकरण करुन घेण्यात आले. याचा फायदा असा झाला की, इतकं पाऊस होऊन ही एक थेंब पाणी नदी पात्राच्या बाहेर आले नाही. यामुळे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील व्यापाऱ्यांचे नुकसान टळले आहे. एकीकडे असा काम करणारा माणूस तर समोर केवळ चमकोगिरी करत मला पाह फुले वाह म्हणणारे काही केवळ मी पणात जगणारे असून, तुम्ही पाण्याच्या टाकी कडे कधी गेले होते का? आ. संदीप भैय्या उन्हात उभे राहून काम करुन घेत होते तेंव्हा तुम्ही कुठे होता असे एक ना अनेक प्रश्न मतदार विचारत असल्याने लई कामे केली म्हणणाऱ्या विरोधकांना पळता भुई थोडी झाली आहे. लोकांच्या सेवेत २४ तास असणारे आ. संदीप क्षीरसागर यांचे बळ मिळाल्याने रवी जयमल्हार बागल यांचे प्रभाग क्रमांक ३ मध्ये पारडे जड झाले असून, येथील मतदार दोन्ही कुबेरांना जागा दाखवून एका फकीराला निवडून देण्याचा निर्धार केला असल्याने येथील निकाल मतदारांच्या मताप्रमाणे होणार आहे.
चौकट
पाणी आणणाऱ्यांना मतदान चमकोगिरी करणाऱ्यांना नाही
आ. संदीप क्षीरसागर आणि माजी आ. सय्यद सलीम यांच्यामुळे बीडकरांचा पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे. ८ दिवसाला ज्यांच्यामुळे आम्हला पाणी मिळत आहे. असे आ. संदीप क्षीरसागर यांच्या पाठीशी आमचा आशीर्वाद कायम राहणार असून, ते सांगतील त्यांना बळ देणार असल्याचे मतदार सांगतं असून, आमचे मत पाणी आणणाऱ्यांना आहे. केवळ व्हाट्सअप, फेसबुकला पोस्ट करुन चमकोगिरी करणाऱ्यांना नाही. असे स्पष्ट मत प्रभाग क्रमांक ३ मधील जनतेने व्यक्त केलं आहे.



