महाराष्ट्र

केंद्रीय तपास यंत्रणाचा वापर विरोधकांच्या विरोधात केला जात आहे – दिलीप वळसे-पाटील

मुंबई | राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून महाविकास आघाडीच्या अनेक मंत्र्यांवर केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून धड टाकण्याचे सत्रच सुरु झाले आहे. त्यातच अनेक मंत्र्यांवर विरोधकांनी आरोप लावल्यानंतर त्यांच्यावर ईडीची कारवाई झालेली दिसून आली होती. त्यातच आता यावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी थेट विरोधकांवर निशाणा साधला आहे.

गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील नागपूर दौऱ्यावर आहेत. त्यांनी दिक्षाभूमी येथेही भेट दिली. यावेळी त्यांनी ईडी आणि सीबीआय सारख्या केंद्रीय यंत्रणेचा वापर चुकीच्या पद्धतीन केला जात असल्याची भूमिका मांडली. ते म्हणाले, सध्या केंद्राच्या तपास यंत्रणाचा वापर विरोधकांना नेस्तनाबूत करण्यासाठी होतोय असं सांगत हे असं कधी होत नव्हतं, अशी खंत देखील व्यक्त केली आहे.

यावेळी त्यांनी नवाब मलिक आणि समीर वानखेडे यांच्यातील संघर्षावर देखील भाष्य केलं आहे. ते म्हणाले, नवाब मलिक आणि आर्यन खान हे दोन वेगवेगळे विषय आहेत. नवाब मलिक यांचा एनसीबी आणि त्यांच्या अधिकाऱ्यांवर काही आक्षेप आहेत, ते असू शकतात, असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.

Back to top button