महिला दिनाच्या निमित्ताने नारीशक्तीचा सन्मान करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन….

जिंतूर (प्रतिनिधी):- दि.12/03/2024 रोजी कस्तुरबा गांधी विद्यालय, जिंतूर येथे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने गटशिक्षणाधिकारी कार्यालय, जिंतूर यांच्या विद्यमाने शिक्षण विभागात कार्यरत असणाऱ्या नारीशक्तीचा सन्मान करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये शिक्षण विभागात कार्यरत असणाऱ्या महिला भगिनींसाठी रांगोळी स्पर्धा, गीत गायन स्पर्धा आणि स्मार्ट नारीशक्ती प्रश्नमंजुषा स्पर्धा याचे आयोजन करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी गटशिक्षणाधिकारी त्र्यंबक पोले, केंद्रप्रमुख मारुती घुगे, पांडुरंग भांबळे, तुकाराम चव्हाण, शंकर दांडगे, शंकर खिस्ते, वसंतराव इंगोले, दत्तराव पोले, राजेंद्र ढाकणे, अब्दुल खलील, लक्ष्मण टाकणसार उपस्थित होते.
प्रास्ताविकात त्र्यंबक पोले यांनी आजच्या काळात सशक्त झालेल्या नारीशक्तीचे कौतिक केले . आज महिल्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय, क्रीडा, सांस्कृतिक, प्रशासकीय सर्वच क्षेत्रात अग्रेसर आहेत. पुरुषांच्या सोबत नाही तर एक पाऊल पुढे टाकून नेतृत्व करत सर्व क्षेत्रात काम करताना दिसत आहेत. असे नारीशक्तीच्या यशाचे कौतुक केले. सदर कार्यक्रमाला महिला शिक्षिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद नोंदवला. गीत गायन स्पर्धा आणि स्मार्ट नारीशक्ती प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये श्रीमती सुनिता मगर, श्रीमती मोरे …….यांनी सहभाग घेतला. रांगोळी स्पर्धेमध्ये श्रीमती मुळे यांचा प्रथम, श्रीमती सुनिता मगर यांचा द्वितीय तर श्रीमती धाबे यांचा तृतीय क्रमांक आला. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साहित्यीक मयूर जोशी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रभाकर नालंदे, संजय माहोरे, श्रीमती रत्नमाला तोडकर, विष्णू शिंदे, माधव गडदे, शिंदे, पाटील,यांनी मेहनत घेतली.



