📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

अंतरवालीत अमरसिंहांना बदामरावांचा धक्का  राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

अंतरवालीत अमरसिंहांना बदामरावांचा धक्का
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश
गेवराई ( प्रतिनिधी ) गेवराई तालुक्यातील तलवाडा जिल्हा परिषद सर्कल मधील अंतरवाली येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या असंख्य कार्यकर्त्यांनी माजी आमदारा अमरसिंह पंडित यांना सोडचिट्टी देऊन माजी राज्यमंत्री पदामराव पंडित यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. हा प्रवेश म्हणजे ऐन निवडणुकीत राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडल्याचे समजले जात आहे.
     गेवराई तालुक्यातील तलवाडा जिल्हा परिषद सर्कल मधील अंतरवाली येथील हरीओम पंडित, संतोष पंडित, दत्ता पंडित, लहू पंडित, कृष्णा पंडित, विशाल पंडित, बजरंग पंडित, तुषार पंडित, अशोक पंडित, दत्ता आघवाणे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी माजी आमदार अमरसिंह पंडित आणि आमदार विजयसिंह पंडित यांना सोडचिट्टी देऊन दिनांक 17 नोव्हेंबर 2025 रोजी माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. याप्रसंगी बीड जिल्हा परिषदचे माजी अर्थ व बांधकाम सभापती युधाजित पंडित, कृष्णा पिंटू सेठ गर्जे, संतोष नाटकर, डॉ वावरे, हरी वावरे, सुंदर तिवारी, ईश्वर मडके, सरपंच किरण आहेर, भाऊसाहेब माखले, तय्यब पठाण, सुनील कांडेकर यांच्यासह भाजपा कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी पुष्पहार घालून स्वागत करून येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये सर्व पदाधिकाऱ्यांनी खांद्याला खांदा लावून काम करून, सामान्य नागरिक व शेतकरी हितासाठी नगर परिषदेसह पंचायत समिती व जिल्हा परिषदवर भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी कामाला लागा असे आवाहन केले.
Back to top button