बीड
विजय पवार व प्रशांत खाटोकर यांना तात्काळ अटक करा : अशोक लोढा

बीड ( प्रतिनिधी) : शहरातील खाजगी क्लासेसचे संचालक विजय पवार व प्रशांत खाटोकर यांनी शैक्षणिक क्षेत्राला काळीमा फासण्याचे काम केले असून अत्यंत घृणास्पद गुन्हा केलेला आहे. बालमनाचा विचार न करता त्यांचे भविष्य उध्वस्थेकडे नेऊ पाहणाऱ्या या वासनांध प्रवृत्तीच्या नराधमाना तात्काळ अटक करावी. तसेच या आरोपींची कॉल रेकॉर्डिंग आणि मोबाईल डाटा व त्यांना सहकार्य करणाऱ्यांचे मोबाईल जप्त करून तपासण्या करण्यात याव्यात. तसेच त्यांना मदत करनाऱ्याना सह आरोपी करण्यात यावे असे निवेदन पोलिस अधीक्षक, बीड यांना भाजपा बीड शहर च्या वतीने देन्यात आले .
खाजगी शिकवणी घेणाऱ्या संस्थांना शिकवणी बाहेरील परिसर व आतील सर्व वर्ग ऑफिस जिने आदींचे कोणताही परिसरात यातून राहणार नाही याची काळजी घेत चित्रण करनारे उच्च प्रतीचे कॅमेरे बसवणे बंधनकारक करावे याचे नियंत्रण पोलिस कंट्रोल रूम मधून व्हावे. तसेच प्रत्येक क्लासेस मध्ये तक्रार पेटी ठेवून भागणार नाही तर तक्रार निवारण कक्ष उभारण्यात यावा. याचेही नियंत्रण आपल्या कक्षा मार्फत व्हावे. त्यामुळे अशा वासनानांध प्रवृत्तीला आळा बसेल. अशा गून्हेगारास तात्काळ अटक करून त्यांना शिक्षा करावी. असे निवेदन देण्यात आले.
या वेळी बीड शहाराध्यक्ष अशोक लोढा, केशव बडे , सतीश कोटेचा, अमोल वडविले सह भाजपाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.