आ. सुरेश धस यांच्या पाठपुराव्याने सांगवी-खडकतसाठी स्वतंत्र ५ एमव्हीए ट्रान्सफॉर्मर

आ. सुरेश धस यांच्या पाठपुराव्याने सांगवी-खडकतसाठी स्वतंत्र ५ एमव्हीए ट्रान्सफॉर्मर
वीजभार विभाजनामुळे गावांच्या वीजपुरवठ्यात होणार सुधारणा; शेतकऱ्यांना मोठा दिलासा; आ.सुरेश धस यांचे मानले आभार
आ.धस व सबस्टेशन फोटो घ्यावा
आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी तालुक्यातील वाळुंज, टाकळशिंग, सांगवी आष्टी, खडकत, पारगाव जोगेश्वरी, बळेवाडी, तवलवाडी तसेच एक्सप्रेस फीडरचा समावेश यापूर्वी एकाच ५ एमव्हीए क्षमतेच्या ट्रान्सफॉर्मरवर होता. त्यामुळे वाढलेल्या वीजभारामुळे वारंवार फ्युज उडणे, लाईट ट्रिप होणे, कमी दाबाने वीज मिळणे तसेच दिवसा शेतीसाठी पुरेसा वीजपुरवठा न मिळणे अशा समस्यांना शेतकरी व ग्रामस्थांना सामोरे जावे लागत होते.
या समस्येची गंभीर दखल घेत आष्टी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी महावितरणकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश येत आता सांगवी आष्टी व खडकत या गावांसाठी स्वतंत्र ५ एमव्हीए क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आला आहे.
या नव्या ट्रान्सफॉर्मरमुळे सांगवी आष्टी व खडकत या गावांचा वीजभार स्वतंत्र झाला असून पूर्वीच्या ट्रान्सफॉर्मरवरील ताण मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. परिणामी वाळुंज, टाकळशिंग, पारगाव जोगेश्वरी, बळेवाडी, तवलवाडी तसेच इतर गावांनाही अधिक स्थिर व दर्जेदार वीजपुरवठा मिळणार आहे.
वीजभाराचे योग्य विभाजन झाल्यामुळे वारंवार होणारे फॉल्ट, कमी दाबाची समस्या आणि लाईन ट्रिपिंगचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे. विशेषतः कृषी पंपधारक शेतकऱ्यांना दिवसा अधिक सुरळीत वीज उपलब्ध होणार असल्याने शेतीची कामे वेळेत पूर्ण करणे शक्य होणार आहे.
या महत्त्वपूर्ण कामाबद्दल वाळुंज, टाकळशिंग, सांगवी आष्टी, खडकत, पारगाव जोगेश्वरी, बळेवाडी व तवलवाडी परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांनी आमदार सुरेश धस यांचे आभार मानले असून, त्यांच्या पाठपुराव्यामुळे अनेक वर्षांपासूनची वीज समस्या मार्गी लागल्याची भावना व्यक्त केली आहे.



