📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

सबसे ज्यादा रोजगार देने वाली भाषा हिंदी है :- डॉ. नितीन कुंभार

सबसे ज्यादा रोजगार देने वाली भाषा हिंदी है :- डॉ. नितीन कुंभार

बीड (प्रतिनिधी) :- येथील सौ. केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर ऊर्फ काकू, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, बीड येथे हिंदी विभागाच्या वतीने आयोजित हिंदी सप्ताह निमित्त व्याख्यानाचे आयोजन कार्यक्रमात डॉ. नितीन कुंभार म्हणाले की, जगामध्ये सर्वांत जास्त बोलली जाणारी भाषा हिंदी दोन नंबर आहे. लवकरच ती एक नंबरवर येईल अशी अपेक्षा करु. सध्या देशामध्ये संपर्काची भाषा म्हणून संपुर्ण भारतभर हिंदी भाषा बोलली जाते. पारंपारीक प्लॅटफॉर्मवरुन डिजीटल प्लॅटफॉर्मपर्यंत हिंदी भाषेचा उपयोग केला जात आहे. त्यामुळे हिंदी बोलणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. असे प्रतिपादन त्यांनी केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिंदी विभाग प्रमुख डॉ. आबासाहेब राठोड यांनी केले. हिंदी सप्ताह निमित्त आयोजित कार्यक्रमात निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, काव्य वाचन यासारख्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये अनुक्रमे वक्तृत्व स्पर्धेत कु. कोमल कुचेकर प्रथम आली तर दिपाली ढेंबरे द्वितीय, कु. पायल घोडके तृतीय आली आहे. तर शुध्द हस्ताक्षर स्पर्धेत कु. ऋतुजा खडके प्रथम , चि. भागवत पिंपळे द्वितीय, चि. श्रावण इगडे तृतीय आले आहेत. तसेच वक्तृत्व स्पर्धेत आत्मनिर्भर भारत या विषयावर कु. दिपाली ढेंबरे प्रथम, चि आझरा मोहम्मद झाकीर द्वितीय, कु. पवार अक्षरा तृतीय, काव्यवाचन प्रतियोगिता मध्ये कु. काळे वैष्णवी प्रथम, कु. ढेंबरे दिपाली द्वितीय, वाघमारे सिध्दार्थ तृतीय अशा प्रकारे विद्यार्थ्यांना पारितोषिक मिळवली.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ. अनिता शिंदे या होत्या तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. शितल इगडे यांनी केले तर आभार प्रा. जयंत साठे मानले.

 

Back to top button