बीड

तेलगाव जि. प. गटातून मानवी हक्क अभियान चे जिल्हा उपाध्यक्ष महादेव उमाप यांना उमेदवारी द्यावी तमाम मतदारांची मागणी

तेलगाव जि. प. गटातून मानवी हक्क अभियान चे जिल्हा उपाध्यक्ष महादेव उमाप यांना उमेदवारी द्यावी तमाम मतदारांची मागणी
 तेलगाव (प्रतिनिधी ) गेल्या अनेक वर्षांपासून चळवळी ते सक्रिय काम करणारे आणि समाज सेवेसाठी स्वतःला वाहून घेणारे महादेव उमाप हे कर्मवीर एकनाथ रावजी आव्हाड साहेब यांचे कट्टर समर्थक होते तर त्यांनी डॉ. मिलिंद आव्हाड यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली मानवी हक्क अभियान आणि ग्रामीण विकास केंद्र दुकडेगाव या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून सबंध मतदार संघामध्ये दलित ओबीसी ओपन व मायनॉरिटीज यांच्यासाठी1990 पासून अविरत कार्य केलेले आहे त्यामध्ये ऊस तोडणी मजुरांचे विविध प्रश्न सोडवून कित्येक मजुरांना सोडून आणून त्यांचे पुनर्वसन करण्याचे काम केले आहे तसेच संघटनेच्या माध्यमातून प्रत्येक गावातील गायरान जमीन नावे करण्यात यावी त्याचबरोबर गायरान जमीन डेव्हलपमेंट विहीर पाईपलाईन बांध-बंधिस्ती बैल जोडी शेती अवजारे देऊन सर्वसामान्य गरीब गायरान धारक शेतकऱ्यांना जमिनीचे मालक करण्यासाठी कार्य केलेले आहे त्याचबरोबर मायक्रो फायनान्स च्या माध्यमातून गावागावात सर्व समाजातील महिलांचे बचत गट बनवून त्यांना व्यवसायासाठी लोन देऊन मिरची कांडप यंत्र शेळीपालन किराणा दुकान बांगडी व्यवसाय व मुलांच्या शिक्षणासाठी मदत केलेली आहे त्याचबरोबर सबंध जिल्हा परिषद गटातील गरजू महिला पुरुषांना संजय गांधी श्रवण बाळ इंदिरा गांधी भूमीहीन यासारख्याना मानधन योजना साठी सातत्याने प्रयत्न करून शेकडो गरजू आणि सत्य लाभधारकांना वरील योजनेचा लाभ दिलेला आहे त्याचबरोबर घरकुल योजना शेतकरी अनुदान यासह अन्याय अत्याचार आणि विविध प्रश्नांवरती सातत्याने कार्यरत आहेत व प्रत्येक गावात कर्मवीर एकनाथराव आव्हाड व मानवी हक्क अभियान या संघटनेला मानणारा मोठा वर्ग आहे व महादेव उमाप यांचा प्रत्येक गावात डेली नियोजित गाठीभेटी आणि विविध कामाच्या निमित्ताने संपर्क असतो म्हणून सर्व जिल्हा परिषद गटातील सर्व समाजातील लोकांची महादेव उमाप यांना शरदचंद्र पवार साहेब यांच्या गटातून उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी होत आहेतर तेलगाव जी. प गटातील मतदाराच्या मागणीचा निश्चितचराष्ट्रवादी काँग्रेस श. प. गट विचार करेल अशी मतदार व्यक्त करत आहेत
Back to top button