रत्नागिरी

सातारा विभागस्तरीय परिषदेत पोहोचली वालोटी नं.१ शाळेची यशोगाथा

  1. सातारा विभागस्तरीय परिषदेत पोहोचली वालोटी नं.१ शाळेची यशोगाथा
    चिपळूण प्रतिनिधी – प्रदीप पवार
    सैनिक स्कुल सातारा येथे निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रमांतर्गत विभाग स्तरीय शिक्षण परिषदेचे आयोजन केले गेले होते. सदर परिषदेसाठी शिक्षण संचालक- मा.राहुल रेखावार, मा. सचिंन्द्र प्रतापसिंह-आयुक्त शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य, मा. दादासो भुसे साहेब-शालेय शिक्षण मंत्री , महाराष्ट्र राज्य हे मान्यवर उपस्थित होते.
    चिपळूण तालुक्यातून जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा वालोटी नं.१, व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुशिवडे शिगवणवाडी या शाळांना प्रतिनिधित्व करण्याची अनमोल संधी मिळाली. विभागस्तरीय परिषदेमध्ये सातारा, सांगली,कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील निवडक शाळांना आपले प्रतिनिधित्व करण्याची व यशोगाथा सादर करण्याची संधी मिळाली.परिषदेमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबविलेल्या शाळांनी आपली यशोगाथा विविध उपक्रमाच्या माध्यमातून सादर केली. सर्व शाळांना वेळेअभावी आपले सादरीकरण करण्याची संधी मिळू शकली नाही मात्र सर्व शाळांची यशोगाथा पीपीटी व पीडीएफ च्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व संशोधन परिषदेकडे संग्रही करण्यात आल्या आहेत. सहभागी सर्व शाळांचे, त्यांच्या अनमोल कामगिरीचे कौतुक व अभिनंदन मा. दादासो भुसे साहेब,शालेय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी केले.सदर कार्यशाळेसाठी मा.भुसे साहेबांनी सायंकाळ पर्यंत उपस्थित राहून शिक्षकांना अतिशय सुरेख असे मार्गदर्शन केले.
    सदर पीपीटी सादरीकरण करण्यासाठी मा. कासार साहेब शिक्षणाधिकारी ,जि. प. रत्नागिरी, मा. शिवलकर साहेब प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, रत्नागिरी यांची प्रेरणा मिळाली.तसेच मा. इरनाक साहेब गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती, चिपळूण, मा. राजहमद देसाई,शिक्षण विस्तार अधिकारी, चिपळूण व मा. सौरवी जाधव शिक्षण विस्तार अधिकारी प्रभाग अलोरे यांचे मार्गदर्शन लाभले. तंत्रस्नेही शिक्षक श्रीराम चव्हाण शाळा स्वयंदेव यांचे विशेष सहकार्य लाभले. वालोटी शाळेचे मुख्याध्यापक संतोष कादवडकर, प्रिया हळदणकर, लक्ष्मण मते सर यांच्या नेतृत्वाखाली अजित कुरणे सर यांना शाळेच्या वतीने चिपळूण तालुक्याचे प्रतिनिधित्व करण्याची सुवर्ण संधी मिळाली व वालोटी नं.१ शाळेची प्रेरणादायी यशोगाथा विभागस्तरीय परिषदेमध्ये पोहोचली.
Back to top button