📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

जिजामाता महिला मंडळ च्या वतिने श्रीराम कथा सोहळ्याचे आयोजन

जिजामाता महिला मंडळ च्या वतिने श्रीराम कथा सोहळ्याचे आयोजन
गेवराई (प्रतिनिधी):- शहरात जिजामाता महिला मंडळ गेवराई यांच्या वतिने भव्य दिव्य संगीतमय श्रीराम कथा चे आयोजन करण्यात आले आहे. या श्रीराम कथे चे प्रवक्ते रामायणाचार्य ,ह.भ.प. प्रकाश महाराज साठे धारुरकर यांची कथा होणार असुन या कथेचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा
असे आवाहन जिजामाता महिला मंडळ गेवराई यांनी केले आहे.
           गेवराई शहरात  जिजामाता महिला मंडळ गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत असून महिलांसाठी त्यांचे सामाजिक उपक्रम सातंत्याने सुरु असतात. यावर्षी प्रथमच जिजामाता महिला महामंडळाच्या वतीने भव्य श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले आहे. कथा प्रवक्ते रामायणाचार्य, ह.भ.प. प्रकाश महाराज साठे धारुरकर यांची कथा प्रारंभ दि.०७ मे २०२५ बुधवार रोजी तर सांगता ११ मे २०२५ रविवार रोजी वेळ दुपारी ०४ वा ते सायं ०७ वाजता ताकडगाव रोड बाळराजे नगर गेवराई शारदा शाळेच्या पाठीमागे होणार असुन याकथेचा तालुक्यातील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिजामाता महिला मंडळ गेवराई यांच्या वतीने करण्यात आले आहे.
Back to top button