बीड

पृथ्वी होळकरचे 12 वी परिक्षेत घवघवीत यश जन्मदिनी आला निकाल मिळविले 90 टक्के गुण

पृथ्वी होळकरचे 12 वी परिक्षेत घवघवीत यश
जन्मदिनी आला निकाल मिळविले 90 टक्के गुण
बीड (प्रतिनिधी)- येथील  पृथ्वी संजय होळकर याने बारावीच्या परिक्षेत घवघवीत यश संपादन करत स्वतःच्या वाढदिवसाच्या दिवशीच कुटूंबियांना व मित्रपरिवाराला यशस्वी भेट दिली आहे. बोर्डाच्या परिक्षेत पृथ्वी होळकर याने 89.83 टक्के म्हणजे जवळपास 90 टक्के गुण मिळवल्यामुळे त्याचे सर्व स्तरातुन कौतुक होत आहे.
पृथ्वी होळकर हा जननगरसेवक संजय होळकर यांचा व नर्सिंग ऑफिसर नंदिनी होळकर यांचा मुलगा असून माजी आदर्श मुख्याध्यापक बाबुराव होळकर यांचा नातू व संपादक राजेंद्र होळकर यांचा पुतण्या आहे. त्याच्या 18 व्या वाढदिवसाच्या दिवशीच त्याने घेतलेल्या मेहनतीचे फळ त्याला मिळाले आहे त्याच्या या यशाचे श्रेय त्याने आपल्या परिवारासह शाळा, कॉलेजमधील शिक्षकांना दिले आहे.
तसेच त्याने क्रॉपसायन्समध्ये 200 पैकी 200 गुण मिळविले असून बायोलॉजीमध्ये 96 गुण मिळविले असून एकुण 600 पैकी 539 एवढे गुण मिळविले आहेत त्याच्या यशाबद्दल त्याचे नातेवाईक, मित्रपरिवारातून कौतुक होत आहे.
Back to top button