राजकीय

अजित पवार हे मोठ्या घोटाळ्याचे गुरु पुन्हा सोमय्या यांनी साधला निशाणा

 

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षाचे एकत्रित महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून अनेक नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणेने चौकशीची सासरमिरा मागे लावली आहे. त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जवळच्या नातेवाईकांवर आणि पुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीवर आयकर विभागाने धाडी थकल्या होत्या. आता याच पार्श्वभूमीवर भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा अजित पवारांवर निशाणा साधला आहे.

सोमय्या म्हणाले की, ‘मी दिवाळीनंतर आणखीन एका मोठ्या नेत्याचा घोटाळा बाहेर काढणार आहे. आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे मोठ्या घोटाळ्याचे गुरु आहेत. त्यांच्याबद्दलचे घोटाळ्याचे पुरावे ईडीकडे सादर करणार आहे,’ असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला. आज मीडियाशी बोलताना त्यांनी हा खुलासा केला आहे.

सोमय्या यांनी यावेळी अजित पवार यांच्यावर आणखीन एक गंभीर आरोप केले. आयकर विभागाने राज्यातील पाच साखर कारखाण्यांवर छापा टाकला. यात अजित पवार यांच्याशी संबंधित कारखानेही आहेत. जरंडेश्वर कारखान्यात अजित पवारांच्या बहिणी भागीदारी आहेत. अजित पवार यांच्याप्रमाणे मी दिवाळीनंतर आणखीन एका मोठ्या नेत्याचा घोटाळा बाहेर काढणार आहे. अजित पवार यांच्याबद्दल सांगायचे झाले तर अजित पवार हे मोठ्या घोटाळ्याचे गुरु आहेत. त्यांच्याबद्दलचे घोटाळ्याचे पुरावे ईडीकडे सादर करणार आहे, असे सोमय्या यांनी म्हंटले आहे.

Back to top button