देशविदेश

डीएसपी इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्सने आणला भारतातील पहिला इक्वल वेटस्ट्रॅटेजीवर आधारित ईटीएफ

 

मुंबई | डीएसपी इन्व्हेस्ट मेंटमॅनेजर्स ने, डीएसपी निफ्टी फिफ्टी इक्वल वेटईटीएफ हा भारतातील पहिला निफ्टी फिफ्टी इक्वल वेटइंडेक्सवर आधारित एक्स्चेंज ट्रेडे डफंड, आणत असल्याची घोषणा केली आहे. इक्वल वेटइंडेक्समध्ये, फंडातील प्रत्येक समभागाला समान महत्त्व दिले जाते. अशारितीने, हे धोरण जर निफ्टीफिफ्टीला लागू केले, तर समानमूल्य असलेला इंडेक्स निफ्टीफिफ्टीमध्ये असलेल्या त्याच ५० कंपन्यांचे समभागधारण करेल आणि प्रत्येक कंपनीला २ टक्के मूल्य देईल. सध्याच्या बाजार भांडवल मूल्य रचनेच्या तुलनेत हे वेगळे आहे. सध्याच्या रचनेत काही समभागांना ९-१० टक्के एवढे मोठे मूल्य दिले जाते आणि निम्नस्तरातील अनेक समभागांना केवळ ०.३ टक्के मूल्य दिले जाते. समानमूल्यधोरणावर (इक्वलवेट) आधारित इंडेक्स मध्ये मात्र सर्वकंपन्यांना मोबदल्यात योगदान देण्याची समान संधी मिळते. आघाडीच्या १० कंपन्यांवरील अति अवलंबित्वयात टाळले जाते.

डीएसपी इक्वल निफ्टीफिफ्टी ईटीएफचे उद्दिष्ट, त्याच्या कार्य पद्धतीनुसार, निफ्टीफिफ्टी इंडेक्सच्या तुलनेत, विभाग (सेक्टर) आणि स्टॉक्स दोहोंमध्ये अधिक चांगले वैविध्य देणे, हे असते. ३०सप्टेंबर, २०२१ रोजी उपलब्ध आकडेवारीनुसार, निफ्टीफिफ्टी इंडेक्सच्या एकूण मूल्यापैकी (वेटेज) सुमारे ६०टक्के मूल्यआघाडीच्या १० कंपन्यांच्या स्टॉक्सना होते, तर निफ्टीफिफ्टी इक्वल वेटेजइंडेक्समध्ये या कंपन्यांना सुमारे २० टक्के मूल्य होते. निफ्टीफिफ्टी इक्वल वेटेडइंडेक्सने आपल्या स्थापने पासून निफ्टीफिफ्टीइंडेक्सच्या तुलनेत २.०२ टक्क्यांनी सरस कामगिरी केली आहे आणि २१ पैकी १२ कॅलेंडर वर्षांमध्ये निफ्टीफिफ्टी इक्वलवेटे डइंडेक्सची कामगिरी निफ्टीफिफ्टी इंडेक्सच्या तुलनेत सरस राहिली आहे.

डीएसपी इक्वल निफ्टीफिफ्टी दोन प्रमुख गुंतवणूकतत्त्वांचे अनुसरण करतो- कंपन्यांमध्ये वैविध्य राखत, बाजारातील चक्रांमधून वाटचाल करून शकतील अशा विभागातील आघाडीच्या स्टॉक्स मध्ये गुंतवणूक करणे आणि समान स्टॉक मूल्यासह, निफ्टीच्या तुलनेत कमी स्टॉक विशिष्ट जोखीम तसेच कमी विभाग केंद्रीकरण देऊ करणाऱ्या विभागांत गुंतवणूक करणे. यात तुलनेने कमी पैसे मोजून वैविध्य पूर्ण पोर्टफोलिओ मिळतोच, शिवाय, निफ्टीफिफ्टी इक्वलवेट ईटीएफमध्ये सुलभरित्या खरेदी आणि तत्काळ (रिअलटाइम) ट्रेडिंगचाही लाभ आहे. इक्वलवेटइंडेक्समध्ये, तिमाही तत्त्वावर, फेर समतोल साधला जातो. या त्रैमासिक फेर समतोल पद्धतीमुळे समान मूल्यपोर्टफोलिओ मध्ये नफ्याची निश्चिती करणारी यंत्रणा अंगभूत असते, फारशी चांगली कामगिरी नकरणाऱ्या समभागांची कमी किंमतीत खरेदी व उत्तम कामगिरी करणाऱ्या समभागांची चढ्यादरांना विक्री असे या यंत्रणेचे स्वरूप असते. न्यू फंड ऑफर १८ ऑक्टोबर रोजी सबस्क्रिप्शन साठी खुली होणार आहे, तर २९ ऑक्टोबर रोजी बंद होणार आहे. त्यानंतर त्याची खरेदीव विक्री शेअर एक्स्चेंजेसमध्ये होईल.

“भारतात इक्वलवेटस्ट्रॅटेजीचा वापर करणारे पॅसिव फंड्स आणण्याची सुरुवात डीएसपी पासून झाली आहे आणि निफ्टीफिफ्टी इक्वलवेट इंडेक्स ट्रॅक करणारा देशातील पहिला ईटीएफ बाजारात आणणे आमच्यासाठी रोमांचक अनुभव आहे. आम्ही जगभरातील समानमूल्य (वेट) निर्देशांकया संकल्पनेचा अभ्यास केला तेव्हा असे लक्षात आले की, दीर्घकाळामध्ये इक्वलमूल्य देणारे फंड्स बाजार भांडवलानुसार मूल्य देणाऱ्या निर्देशांकांच्या तुलनेत अधिक चांगला मोबदला मिळवून देतात. केवळ आघाडीच्या काही कंपन्यांच्या सहभागा ऐवजी सर्व कंपन्यांना सहभागाची संधी मिळाल्यासहे घडते. गेल्या पाच वर्षांत घडले त्याप्रमाणे, अर्थव्यवस्थेतील नफा काही निवडक कंपन्यांमध्ये केंद्रीकृत होतो, त्याकाळात या धोरणातून तयार करण्यात आलेल्या पोर्टफोलिओ ची कामगिरी खालावू शकते. मात्र, दीर्घकाळात सर्व विभागांतील चांगल्या कंपन्या वाढतात व मूल्यनिर्मिती करतात अशा परिस्थितीत इक्वलवेट धोरण इंडेक्समधील प्रत्येक कंपनीला अर्थपूर्ण महत्त्व दिले जाते. समानभर देण्याच्या धोरणामुळे, बहुतेक ओव्हर ओन्ड विभाग, कोणत्याही वेळी धोक्या बाहेर असतात,” असे डीएसपी इन्व्हेस्ट मेंटमॅनेजर्स चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी कल्पेन पारेख म्हणाले.

Back to top button