संपादकीय

कोल्हापुरात दोन्ही डोस घेतलेले नसतील तर प्रवेश नाकारा, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश !

 

कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन व्हेरियंटचा प्रसार वेगाने होत असल्याने संसर्गाचा धोका वाढत असल्यामुळे सर्वच जिल्हे आता अधिक सतर्क झाले आहेत. त्यातच आता लस घेतलेली नाही, त्यांना पेट्रोल पंप, धान्य दुकान, उद्योग- व्यवसाय या ठिकाणी प्रवेश नाकारला जावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आज केले. संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. रेखावार म्हणाले,

जिल्ह्यात कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी संपूर्ण लसीकरण बंधनकारक असून प्रत्येक नागरिकाने संपूर्ण लसीकरण करून घेणे, सामाजिक अंतर पाळणे, मास्क व सॅनिटायझरचा वापर करणे याबरोबरच शासन व प्रशासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले. त्यांच्या या आव्हानाला कोल्हापूरकर कशी साथ देतायत हे पाहावे लागणार आहे.

”कोविड प्रतिबंधासाठी लशीचे दोन्ही डोस घेणे गरजेचे आहे. अद्यापही पहिला डोस घेतला नाही, अशा १८ वर्षे पूर्ण झालेल्यांनी त्वरित पहिला डोस घ्यावा. दुसरा डोसही विहीत कालावधीत घ्यावा. मास्क नाही; प्रवेश नाही हा उपक्रम जिल्ह्यात यशस्वीपणे राबविण्यात आला. आता याच पद्धतीने संपूर्ण लसीकरण नाही तर प्रवेश नाही, हा उपक्रम देखील प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे.

तसेच जिल्ह्यातील सर्वच खासगी आस्थापना, दुकानदार, घाऊक व्यापारी, छोटे-मोठे व्यावसायिक, एमआयडीसी, पेट्रोल पंप, रेशन दुकानदार यांनी त्यांच्या आस्थापनाच्या ठिकाणी ठळक अक्षरात ‘संपूर्ण लसीकरण नाही तर प्रवेश नाही’ अशा आशयाचे फलक लावावेत. खरेदीसाठी वा अन्य कारणांसाठी येणाऱ्यांकडे लसीकरणाचे दोन डोस पूर्ण झालेल्या प्रमाणपत्राची पडताळणी करूनच त्यांना सेवा द्यावी.”

Back to top button