मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानाचे बक्षीस वितरण

मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानाचे बक्षीस वितरण
अंबाजोगाई/(प्रतिनिधी) : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्र. २ अंतर्गत शुक्रवारी (ता. २५) पंचायत समितीच्या सभागृहात बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी अंबाजोगाई तालुक्यातील भारज पाटी येथील श्रीराम माध्यमिक विद्यालयास तृतीय बक्षिस रक्कमेचा धनादेश देण्यात आला.
राज्यातील सर्वच शाळांचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा हे अभियान शासनाने सुरू केले आहे. अंबाजोगाई तालुक्यातील सर्व जिल्हा परीषदेच्या व खाजगी शाळे मध्ये हे अभियान राबविण्यात आले. गटविकास अधिकारी समृध्दी दिवाणे, गटशिणाधिकारी चाँद शेख, विस्तार अधिकारी बी. के. नांदुकर, मधुकर सुर्वणकार, मुमताज पठाण यांच्या हस्ते बक्षीसाच्या रक्कमेचा धनादेश वितरित करण्यात आला. श्रीराम माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका निलप्रभा ढाणे, पट्टीवडगाव केंद्राचे केंद्रप्रमुख राजेसाहेब किर्दंत, सायगाव केंद्राचे केंद्रप्रमुख रंगनाथ पाटील, सुंदर नेहरकर, शिक्षक उपस्थित होते.
राज्य शासनाच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा अभियान राबवले जात आहे या अभियानात खासगी व्यवस्थापन प्रकारात भारज पाटी येथील श्रीराम माध्यमिक विद्यालयाने अंबाजोगाई तालुक्यातून तिसरा क्रमांक मिळवला होता.
मुख्याधिपीका निलप्रभा ढाणे, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी, सर्व विद्यार्थ्यांचा सहभाग होता. लालबहादूर शास्त्री शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा कमलबाई शिंदे, सचिव दशरथ शिंदे, संचालक मंडळाने मुख्याध्यापिका सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसह विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.



