बीड

माजलगाव पशुसंवर्धन तालुका अधिकारी आणि पुरवठादार यांनी  अनुसूचित जाती,जमातीच्या लाभार्थी यांची लूट थांबवावी – डॉ. संजय नाकलगावकर

माजलगाव पशुसंवर्धन तालुका अधिकारी आणि पुरवठादार यांनी  अनुसूचित जाती,जमातीच्या लाभार्थी यांची लूट थांबवावी – डॉ. संजय नाकलगावकर
प्रतिनिधी ( माजलगाव ) :-सामाजिक न्याय विभाग राज्यातील तळागाळात गावपर्यतच्या अनुसूचित जाती-जमाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग, इतर मागासवर्ग, अपंग व दुर्बल घटक त्याचे जीवनमान  उचवण्यासाठी पशुसंवर्धन विभाग मार्फत गाय, म्हैस दुधाळ गट योजना, शेळी, मेंढी योजना राबविण्यात येतात.
माजलगाव पशुसंवर्धन तालुका अधिकारी डॉ. ताराबाई लांडे व त्याचे सहाय्यक डॉ रणजित शेजुळ आणि संबंधित पुरवठादार हे संगनमताने त्या लाभार्थी यांची लूट करत   एक लाख साठ हजार रुपयांची योजना असताना लाभार्थ्यांना 1,20,000 देऊन प्रत्येक गटामागे 40 हजार गिळंकृत करण्याचा सपाटा लावला आहे, शेळी गटात सुद्धा 10 शेळ्या आणि 1 बोकड देणे आवश्यक आहे परंतु तसे न करता वजनाचे कारण दाखवत 6,7 शेळ्या देण्यात येतात यामध्ये समाज कल्याण अधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन उपयुक्त आणि जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांनी वाटप केलेल्या गटाची व गट खरेदी सद्स्य सोबत घेत प्रत्येक्षप स्थळ पाहणी करत संबंधित अधिकारी यांच्यावर योग्य ती कार्यवाही करण्याचे आव्हानं माहिती अधिकार तालुका प्रचार प्रमुख डॉ. संजय नाकलगावकर यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
Back to top button