बीड

वंचितअपंग व्यक्तींनी दिव्यांग शिबिराचा लाभ घ्यावा- राजेंद्र मस्के

वंचितअपंग व्यक्तींनी दिव्यांग शिबिराचा लाभ घ्यावा-
राजेंद्र मस्के

गेवराई मध्ये दिव्यांग शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद..
.
गेवराई प्रतिनिधी:-जिल्ह्याचे खा. बजरंग (बप्पा) सोनवणे यांच्या संकल्पनेतुन
सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली, भारतीय कृत्रिम अंग निर्माण, जिल्हा प्रशासन बीड यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाभरात प्रत्येक तालुका निहाय दिव्यांग शिबिराचे आयोजन केले जात आहे. आज गेवराई येथील पंचायत समिती येथे शिबिर संपन्न झाले. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
अपंग तथा दिव्यांग व्यक्तींसाठी शासनाच्या विविध योजना असून प्रत्येक अपंग व्यक्तींना योजनेचा लाभ आणि अत्यावश्यक उपकरण आणि साधन मिळाली पाहिजेत. अनेक अपंग व्यक्ती  योजने पासून वंचित आहेत.
यासाठी दिव्यांग शिबिराचे आयोजन केले जात आहे.
दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकां साठी कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधने मोफत वाटपासाठी पूर्व तपासणी व नोंदणी करून पात्र दिव्यांगांना
कृत्रिम अवयव व उपकरणाचे
वाटप केले जाणार आहे.
वंचित तथा गरजू अपंग व्यक्तींनी दिव्यांग शिबिराचा
जास्तीत जास्त लाभ घ्यावा.
असे आवाहन राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के यांनी केले आहे.
दिव्यांगांना शासनाच्या प्रत्येक योजनेचा फायदा मिळाला पाहिजे, नियमितपणे वेळेवर मानधन वाटप व्हावे, मानधनात वाढ करावी, दिव्यांगांच्या घरकुल कोट्यात वाढ करून जास्तीत जास्त घरकुलाचे वितरण व्हावे अशी मागणी काही दिव्यांग व्यक्तींनी यावेळी केली

Back to top button