बीड

लिंबागणेश येथील भालचंद्र विद्यालयाचे प्राचार्य किसन सावंत यांचा सेवापूर्ती सोहळा उत्साहात संपन्न

लिंबागणेश येथील भालचंद्र विद्यालयाचे प्राचार्य किसन सावंत यांचा सेवापूर्ती सोहळा उत्साहात संपन्न
ग्रामीण भागात गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी भालचंद्र शिक्षण संस्था; प्राचार्य सावंत यांच्या ३३ वर्षांच्या सेवेला मान्यवरांकडून सलाम – राजकुमार कदम
लिंबागणेश:-(दि.५) लिंबागणेश येथील भालचंद्र विद्यालयाचे प्राचार्य किसन बाळाराम सावंत (बापू) यांच्या सेवापूर्ती निमित्त आयोजित कृतज्ञता सप्ताह सोहळा मोठ्या उत्साहात व भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला. संस्थेच्या शैक्षणिक प्रगतीसाठी तब्बल ३३ वर्षे मोलाचे योगदान देणाऱ्या प्राचार्य सावंत यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सहकुटुंब गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भालचंद्र शिक्षण संस्थेचे सचिव दीपकदादा घुमरे होते. प्रमुख अतिथी म्हणून बेलेश्वर संस्थानचे मठाधिपती महंत शांतीब्रम्ह तुकाराम महाराज, मराठवाडा शिक्षक संघाचे सरचिटणीस राजकुमार कदम, सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, संस्थेचे उपाध्यक्ष कल्याण बापू वाणी, संचालक रमेशचंद्र पाटील, कॅप्टन सुंदरराव वाणी, ह.भ.प. तुकाराम भारती महाराज, ह.भ.प. भक्तीदास महाराज शिंदे, भागवत अण्णा आजबे, विनायकराव माध्यमिक विद्यालय वैद्यकिन्हीचे सचिव, माजी प्राचार्य उद्धव बांगर, डी. बी. चव्हाण, केंद्रप्रमुख दीपक घाटे, लिंबागणेशचे सरपंच बाळासाहेब जाधव, माजी पर्यवेक्षक अंगद हावळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात दीपकदादा घुमरे यांनी स्व. द. बा. घुमरे तात्यांनी रुजविलेल्या भालचंद्र शिक्षण संस्थेच्या शिक्षणरूपी वटवृक्षाचे जतन व संवर्धन करण्यामध्ये प्राचार्य किसन सावंत यांनी अत्यंत मोलाची भूमिका बजावल्याचे सांगितले. संस्थेची गौरवशाली परंपरा आणि संस्कारांचा वारसा अधिक सक्षमपणे पुढे नेण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
प्रमुख अतिथी राजकुमार कदम यांनी आपल्या मनोगतात भालचंद्र शिक्षण संस्था ही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी आदर्श संस्था असल्याचे सांगत संस्थेच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचे कौतुक केले.
सत्काराला उत्तर देताना प्राचार्य किसन सावंत यांनी आपल्या ३३ वर्षांच्या सेवाकालातील आठवणींना उजाळा देताना भावना व्यक्त केल्या. सेवाकाळात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या सर्व सहकारी, विद्यार्थी, पालक, संस्था पदाधिकारी आणि हितचिंतकांचे त्यांनी मनःपूर्वक आभार मानले. यावेळी त्यांच्या पत्नी शिक्षिका आशा कदम तसेच पुत्र अमित, सुमित आणि कुटुंबीय उपस्थित होते.
कार्यक्रमानंतर मान्यवर, माजी विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश आजबे यांनी केले. सूत्रसंचालन मुकुंद मोटे यांनी तर आभार प्रा. ज्ञानेश्वर भोसले यांनी मानले.
चौकट : सेवाभावी शिक्षणाचा गौरव
प्राचार्य किसन सावंत यांनी भालचंद्र विद्यालयात ३३ वर्षे सेवाभावाने कार्य करत संस्थेच्या शैक्षणिक प्रगतीत महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या नेतृत्वाखाली शैक्षणिक गुणवत्ता, शिस्त, संस्कार आणि सामाजिक बांधिलकी या मूल्यांना बळ मिळाले. त्यांच्या सेवापूर्ती सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून त्यांच्या कार्याचा गौरव केला आणि निवृत्तीनंतरच्या निरोगी, आनंदी व यशस्वी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
प्राचार्य किसन सावंत यांनी भालचंद्र विद्यालयात ३३ वर्षे सेवाभावाने कार्य करत संस्थेच्या शैक्षणिक प्रगतीत महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या नेतृत्वाखाली शैक्षणिक गुणवत्ता, शिस्त, संस्कार आणि सामाजिक बांधिलकी या मूल्यांना बळ मिळाले. त्यांच्या सेवापूर्ती सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून त्यांच्या कार्याचा गौरव केला आणि निवृत्तीनंतरच्या निरोगी, आनंदी व यशस्वी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
मो.नं.८१८०९२७५७२
Back to top button