📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

प्रभू श्रीरामचंद्रांनी सीतेचे अपहरण केल्यामुळे रावणाचा वध केला नसून.. अधर्म अत्याचार आणि अहंकारामुळे केला–महंत मंदार महाराज रामदासी

प्रभू श्रीरामचंद्रांनी सीतेचे अपहरण केल्यामुळे रावणाचा वध केला नसून.. अधर्म अत्याचार आणि अहंकारामुळे केला–महंत मंदार महाराज रामदासी

आष्टी ( प्रतिनिधी )
प्रभू श्रीरामचंद्रांनी रावणाचा वध हा केवळ सीतेच्या अपहरणामुळे केला नसून रावणाचा नाश हा त्याचा अधर्म अहंकार आणि लोककल्याण विरोधी आचरणामुळे त्याचा वध करावा लागला असे प्रतिपादन दादेगाव येथील देवदास स्वामी मठाचे मठाधिपती महंत मंदार महाराज रामदासी यांनी केले.. आष्टी येथे आमदार सुरेश धस यांनी आयोजित केलेल्या श्री राम कथा ज्ञानयज्ञ सोहळ्यामध्ये सहाव्या दिवशी चे कथा निरूपण करताना ते बोलत होते…
ते पुढे म्हणाले,
रावण हा विद्वान पराक्रमी आणि शिवभक्त असला तरी तो अहंकारी विषय असणे च्या आहारी गेलेला अत्याचारी होता त्याने अनेक ऋषीमुनींवर अत्याचार केले त्यांच्या यज्ञाचा विध्वंस केला देवतांचा अपमान केला स्त्रियांवर बलप्रयोग करणे ही त्याची प्रवृत्ती होती त्यामुळे तो राजा असूनही राक्षसी प्रवृत्तीचा होता सीतेचे अपहरण हे एक कारण होते सीता ही पवित्र आणि निष्पाप तसेच परधन असतानाही तिच्याविषयी लालसा उत्पन्न होऊन तिचे अपहरण करणे हे राजधर्माच्या विरोधात होते तसेच सीतेचे अपहरण म्हणजे संपूर्ण नारीशक्तीचा अपमान होता या कृतीने रावणाने स्वतःच्या विनाशाची सुरुवात करवून घेतली.
प्रभू श्रीरामांनी युद्धापूर्वी त्याला शरण येण्याची संधी दिली योग्य मार्ग दाखवण्याचा प्रयत्न केला परंतु रावणाने अहंकार न सोडल्यामुळे धर्मरक्षणासाठी आणि अधर्माचा नाश करण्यासाठी श्रीरामांना युद्ध करावेच लागले त्यामुळे राम रावण युद्ध हे वैयक्तिक सुडाचे नव्हे तर धर्मयुद्धाचे प्रतीक आहे रावणाचा वध झाल्यानंतर ऋषीमुनींचे यज्ञ सुरक्षित झाले देवतांना भयमुक्त मिळाली समाजाला अधर्माविरुद्ध ठाम उभे राहण्याचा संदेश मिळाला म्हणून रामचंद्रांनी रावणाचा वध केल्यानंतरही त्याच्या विद्वत्तेचा सन्मान केला त्यामुळे रावणाचा नाश हा केवळ सीता हरणाचा परिणाम नसून त्याने दीर्घकाळ चालवलेल्या अधर्म अहंकार आणि अन्याय या मुळे त्याचा वध अपरिहार्य होता त्यावरून एक लक्षात येते की, श्रीराम हे न्यायाचे प्रतिनिधी होते आणि रावण हा अ धर्माचा प्रतिनिधी होता. अधर्म हा कितीही शक्तिशाली असला तरी शेवटी त्याचा नाश निश्चित होत असतो हा रामायणाचा सर्वकालिका संदेश आहे असेही त्याने निरूपण करताना शेवटी प्रतिपादन केले

Back to top button