भाजपमध्ये प्रवेश केला नाही म्हणून मला तुरुंगात टाकले; काँग्रेस नेत्याचा दावा !

कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार यांनी सोमवारी आपण भाजपला पाठिंबा दिला नाही, तसेच भाजपमध्ये प्रवेश न केल्यामुळे आपल्या तिहार तुरुंगात पाठवण्यात आल्याचा दावा केला आहे. त्यांनी यावेळी भाजपवर टीका करत राज्यातील भाजप सरकारला देशातील सर्वात भ्रष्ट सरकार म्हटले आहे. या आरोपांमुळे
तिहार तुरुंगात मी गेलो कारण भाजपने मला पाठवले. मी भाजपला पाठिंबा दिला नाही, तसेच त्यांच्यासोबत आलो नाही, त्यामुळे त्यांनी मला तुरुंगात टाकले, असे शिवकुमार यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री यांच्या वक्तव्याला उत्तर देताना सांगितले. तिहार तुरुंगात डीके शिवकुमार का गेले होते, असा सवाल भाजप नेत्यांनी केला होता.
भाजपमध्ये प्रवेश केला असता तर तुरुंगात गेले नसते का, असे विचारले असता शिवकुमार म्हणाले, सर्वांना सर्व काही माहित आहे आणि त्याचे रेकॉर्ड देखील आहेत. यासंदर्भातील वृत्त द न्यूज मिनीटने दिले आहे. शिवकुमार यांनी राज्य कंत्राटदार संघटनेने लावलेल्या किकबॅक शुल्काच्या निष्पक्ष चौकशीची मागणी करत कर्नाटकातील सध्याचे भाजप सरकार या देशातील सर्वात भ्रष्ट सरकार असल्याचे म्हटले आहे.