संपादकीय

 “राज्यातील ओबीसी मंत्री कुठं आहेत ते तर सर्व पवारांच्या ताटाखालचे मांजर” 

सांगली |  सध्या ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फेऱ्या झाडायला सुरवात केल्या आहेत. त्यातच सर्वोच्च न्यायालयानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी उमेदवारांना 27 टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. याचे चांगलेच पडसाद उमटत आहेत. यावरच आता भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आघाडी वेळ टीका केली आहे.
ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसला असल्याचा आरोप करत भाजप आमदार गोपीचंद पळकर यांनी ठाकरे सरकावर हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी पवार कुटुंबीयांना लक्ष केल्याचं पहायला मिळालं. ओबीसी आरक्षणाच्या अध्यादेशाला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली आहे. आता राज्यातील ओबीसी मंत्री कुठं आहेत ते तर सर्व पवारांच्या ताटाखालचं मांजर झाल्याची खोचक टीका गोपीचंद पडळकर यांनी पवारांवर केली आहे.
दरम्यान, राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयाच्या सूचना पाळल्या नसल्याचाही आरोप पळकरांनी केला आहे. तर दुसरीकडे obc नेते छगनभुजबल यांनी केंद्रावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, आम्ही कोर्टात आमची बाजू मांडणार आहोत. मात्र भाजपकडून कोर्टात सातत्याने विरोध केला जात आहे. ते कुणाच्या सांगण्यावरून काम करत आहेत. यांना आवरा असं आम्ही फडणवीसांना सांगितलं आहे, असंही ते यावेळी म्हणाले.
Back to top button