बीड
शिंदे शिवसेनेच्या देगलुर युवा तालुकाध्यक्षपदी नामदेव पाटील देगावकर यांची निवड

शिंदे शिवसेनेच्या देगलुर युवा तालुकाध्यक्षपदी नामदेव पाटील देगावकर यांची निवड
नांदेड/ प्रतिनिधी
देगलूर तालुक्यात शिंदे शिवसेनेच्या नेतृत्वात बदल झाला असून युवा तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी उमदे नेतृत्व नामदेव पाटील देगावकर यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे तालुक्यात पक्ष संघटनाला नवे बळ मिळणार हे अधोरेखित झाले आहे.
सोमवार दि. २३ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजता ठाणे येथे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या कार्यालयात देगावकर यांना अधिकृत प्रशस्तीपत्र देण्यात आले. पक्षविस्तार, ग्रामीण भागात संघटन मजबूत करणे आणि तळागाळातील कार्यकर्त्यांना सक्रिय करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. या नियुक्ती प्रक्रियेत उपमुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव बालाजी पाटील खतगावकर यांनी समन्वयाची महत्त्वाची भूमिका बजावल्याचे बोलले जात आहे.
नामदेव पाटील देगावकर यांना यापूर्वी भाजप युवामोर्चाच्या तालुकाध्यक्षपदाचा अनुभव आहे. ग्रामीण भागातील संपर्क, संघटनात्मक कामाचा अनुभव आणि युवकांमधील प्रभाव या पार्श्वभूमीवर त्यांची निवड करण्यात आल्याचे मानले जात आहे. बालाजी पाटील खतगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली देगावकर यांच्यासह ॲड. अंकुश राजे, डॉ. सुनील जाधव, सुरेश येलबुगडे, ज्ञानेश्वर सुरनर, सतीश धाने, ज्ञानोबा शिंदे, विठ्ठल कोकणे, विलास पाटील आदी कार्यकर्त्यांनी शिंदे शिवसेना गटात प्रवेश केला आहे.
पक्षाने दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू. गावोगावी शाखा वाढवून युवकांना संधी देण्यात येईल तसेच स्थानिक प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेतली जाईल याशिवाय सध्याचे तालुक्याचे राजकारण अतिशय गढूळ झाले आहे. याला चाप बसून शिंदे शिवसेनेची संघटनबांधणी आणि कार्यकर्त्यांचे बळ एकत्र आणत शिंदे शिवसेना अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्नशील राहणार अशी ग्वाही नूतन अध्यक्ष नामदेव पाटील देगावकर यांनी व्यक्त केली आहे.



