बीड
सिंदफणा शाळेचे प्राचार्य अन्वर शेख यांची युनेस्कोच्या कार्यशाळेसाठी निवड

सिंदफणा शाळेचे प्राचार्य अन्वर शेख यांची युनेस्कोच्या कार्यशाळेसाठी निवड
भारतातील १०० निवडक प्राचार्यांमध्ये बीडकरांचा समावेश
माजलगाव (प्रतिनिधी) – येथील विद्याभुवन शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सिंदफणा पब्लिक स्कूलचे कार्यतत्पर प्राचार्य अन्वर शेख यांना युनेस्को तर्फे आरोग्य आणि कल्याण कार्यक्रमाच्या अंमलबजावणीला बळकटी देण्यासाठी आयोजित केलेल्या पाच दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेसाठी निमंत्रित करण्यात आले आहे. या प्रतिष्ठित निवडीबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
सविस्तर वृत्त असे की, युनेस्को,एनसीईआरटी आणि सीबीएसई यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या या कार्यशाळेचे उद्दिष्ट सीबीएसई संलग्न शाळांमधील मुख्य प्रशिक्षकांना क्षमता निर्माण करून देणे आहे. हे प्रशिक्षक त्यांच्या स्वतःच्या शाळांमध्ये आरोग्य आणि कल्याण कार्यक्रम राबवण्याबरोबरच शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी संसाधन व्यक्ती म्हणूनही काम करतील. या कार्यशाळेसाठी भारतातील हजारो सीबीएसई संलग्न शाळांमधून केवळ १०० प्राचार्यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील फक्त ४ प्राचार्यांचा या यादीत समावेश आहे, त्यामध्ये बीड जिल्ह्यातील सिंदफणा पब्लिक स्कूलचे प्राचार्य अन्वर शेख आणि महावीर इंग्लिश स्कूलचे प्राचार्य अभिलाष के के यांचा समावेश आहे.सदरील कार्यशाळा दिनांक २१ जुलै ते २५ जुलै २०२५ या काळात नवी दिल्ली येथे होणार आहे. युनेस्को च्या नवी दिल्ली प्रादेशिक कार्यालयाकडून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.या उपक्रमाद्वारे शैक्षणिक संस्थांमध्ये आरोग्य आणि कल्याणाच्या क्षेत्रात गुणवत्तापूर्ण सेवा प्रदान करण्याचे लक्ष्य आहे. या प्रशिक्षणामुळे प्राचार्य अन्वर शेख यांना आणि सिंदफणा पब्लिक स्कूल ला आरोग्य कार्यक्रमाच्या क्षेत्रात नवीन दिशा मिळण्याची अपेक्षा आहे.भारतभरातील केवळ १०० निवडक प्राचार्यांमध्ये स्थान मिळणे हे केवळ बीड जिल्ह्यासाठीच नव्हे तर संबंध मराठवाड्यासाठी अभिमानाची बाब आहे. ही निवड म्हणजे अन्वर शेख यांनी आज पर्यंत शिक्षण क्षेत्रासाठी केलेला त्याग, परिश्रम आणि समर्पनाचा योग्य सन्मान होय. त्यांच्या उत्कृष्ट कार्यशैलीचा आणि शिक्षण क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरीचा हा एक पुरावाच आहे.
या प्रतिष्ठित कार्यशाळेसाठी निवड झाल्याबद्दल प्राचार्य अन्वर शेख यांचे सिंदफणा पब्लिक स्कूलचे अध्यक्ष आमदार प्रकाशदादा सोळंके, सचिव मंगलाताई सोळंके, उपाध्यक्ष वीरेंद्र सोळंके, समन्वयक नीला देशमुख, उपप्राचार्य राहुल कदम, शैक्षणिक विभाग प्रमुख जीबी ऑगस्टन, सुनिता सुरवसे, धनंजय सोमवंशी, अर्चना जाधव, डॉ. वरुणराज तौर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.


