बीड

कापूस सोयाबीन फवारणी साहित्य खरेदी मध्ये कृषी खात्यात करोडचा भ्रष्टाचार – वसंत मुंडे 

कापूस सोयाबीन फवारणी साहित्य खरेदी मध्ये कृषी खात्यात करोडचा भ्रष्टाचार – वसंत मुंडे 
मुंबई (प्रतिनिधी) महाराष्ट्राच्या त्रिमूर्ती हसरकारने कृषी खात्या अंतर्गत २५० कोटीचे कृषी साहित्य खरेदीत भ्रष्टाचार महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ व कृषी मंत्री कार्यालया कडून निविदा मॅनेज करून करोडोचा भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत मुंडे यांनी केला . खरेदीमध्ये गैरव्यवहार झाल्याबाबत कृषी मंत्रालय, कृषी आयुक्तालय पुणे  व कृषी उद्योग महामंडळातील दोषी अधिकाऱ्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत या गैरव्यवहारात कृषिमंत्री व त्यांच्या कार्यालयातील अधिकारी सहभागी असून शासन स्तरावर मुख्यमंत्री राज्यपाल मुख्य सचिव तसेच ईडी सी बी आय लोक आयुक्त लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला चौकशीत करावी अशी मागणी गेल्या अनेक दिवसापासून राजकीय नेत्यांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी केल्या आहेत.या गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी अतिरिक्त मुख्य  सचिव अनुप कुमार व कृषी आयुक्तालय डॉक्टर प्रवीण गेडाम या अधिकाऱ्यांचा विरोध होता त्यावेळी गेल्या दहा महिन्यापासून चालू असलेल्या चौकशीत त्यावेळी त्यांची बदली करण्यात आली . गैरव्यवहाराला कृषी मंत्रालयाच्या कार्यालयातील एक खाजगी सचिव. कृषी आयुक्तालयातील एक माजी संचालक, एक विद्यमान सहसंचालक, पूर्णता जबाबदार आहेत. या अधिकाऱ्यांनी पद्धतशीरपणे संगणमत करून कॉन्ट्रॅक्टदारांना सोयीची ठरणारी योजना तयार केली. त्यामुळे नियम बदलले. अडचणीचे ठरणारे नियम रद्द करण्यासाठी शासनाकडून मान्यता आणली. निविदामध्ये हेराफेरी केली असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया, काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी  २० जून २०२४ रोजी मुख्यमंत्री मुख्य सचिव राज्यपाल सीबीआय ईडी एसीबी लोक आयुक्त कडे पुराव्यासहित तक्रार दाखल केली आहे.गैरव्यवहाराच्या रकमा नॅनो डीएपी तीन कोटी 45 लाख, नॅनो एरिया बारा कोटी 93 लाख 75 हजार, डिजिटल सेंसर आठ लाख 61 हजार चारशे रुपये, कापूस साठवण गोण्या 52 कोटी 53 लाख 27 हजार दोनशे रुपये, सोयाबीन साठी नॅनो डीएपी 23 कोटी 24 लाख 50 हजार रुपये. सोयाबीन साठी नॅनो युरिया आठ कोटी 71 लाख 50 हजार रुपये, मेटालडीहाईड कीटकनाशक 13 कोटी 15 लाख, फवारणी पंप 26 कोटी 99 लाख 68 हजार आधी रकमा निवेदना मार्फत पुराव्यासहित तक्रारी करण्यात आल्या.आजच्या स्तरावर गैरव्यवहाराची सीबीआय ईडी लोकायुक्त मार्फत शासनाकडून चौकशी चालू झालेली आहे, यासंदर्भात श्री राधा प्रधान सचिव कृषी विभाग यांनी विरोध केल्यामुळे त्यांची बदली केली असुन तशा न्युज पेपर व दूरदर्शन वर बातम्या आलेल्या आहेत.  व्ही राधा ह्या सक्षम अधिकारी  होत्या कृषी मंत्र्यांचे ऐकले नाही म्हणून त्यांची बदली तात्काळ करण्यात आली. गैरव्यवहारामुळे कृषी खाते बदनाम झाले आहे. सर्व शासन स्तरावर चौकशी करून तात्काळ दोषींवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात यावेत अशी मागणी काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी शासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
Back to top button