बीड
डाव्या आघाडीच्या धरणे आंदोलनात सहभागी व्हा- प्रा. सुशीलाताई मोराळे

बीड प्रतिनिधी:-दिनांक 22 एप्रिल रोजी बीड जिल्हा कचेरीवर डाव्या आघाडी तर्फे प्रचंड धरणे आंदोलनाचे आयोजन केले आहे. जन सुरक्षा कायद्याच्या विरोधात हा एल्गार डाव्यांनी पुकारला असून हे विधेयक सरकारने मागे घ्यावे अशी मागणी करण्यात येत आहे. या आंदोलनात डाव्यासोबत लोकशाही वादी पक्षांनी पण सामील व्हावे असे आव्हान किसान संघर्ष समितीच्या वतीने प्रा. सुशिलाताई मोराळे यांनी केले आहे.
भारत सरकारने जनता विरोधी हे बिल आणले आहे लोकशाहीला अत्यंत मारक हे बिल आहे आम जनतेच्या लोकशाही हक्काला गळफास लावणारे हे बिल आहे. या विधेयकामुळे अघोषित आणीबाणीच आणली जात आहे, आपल्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर संघर्ष आता करता येणार नाही उपोषण धरणे निदर्शने हे करण्याचा नागरिकांचा मूलभूत अधिकारच यामुळे काढून घेतला जाणार आहे हे विधेयक अन्याय करणारे आहे कोणीही इयत्ता पक्ष एकही संघटना या बिलाच्या विरोधात लढू शकत नाही डाव्यांनी लोकशाहीवादी मित्र पक्षांना निमंत्रण दिले नाही तरीही लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी त्यांच्या निमंत्रणाची वाट न बघता या आंदोलनात जनतेने मोठ्या संख्येने सहभागी पाण्याची गरज आहे समाजवादी आंबेडकरवादी लोकशाहीवादी या आंदोलनास सक्रिय पाठिंबा द्यावा असे आवाहनही प्रा. सुशीलाताई मोराळे यांनी केले आहे. इंग्रजांनी हे बिल आणले होते तेव्हा भगतसिंग व त्यांच्या साथीदारांनी या बिलाला प्रचंड विरोध केला होता.
इंग्रज भारतातून जाऊन 76 वर्ष झाले असले तरी त्यांच्या नाजायज अवलादी आजही जिवंत आहेत त्यामुळे सर्वसामान्य जनतेने या 22 एप्रिल च्या लढ्यात सहभागी व्हावे असे कळकळीचे आव्हान किसान संघर्ष समितीच्या मार्फत प्रा. सुशीला ताई मोराळे यांनी केले आहे किसान संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सामील व्हावे असे पत्रकात म्हटले आहे.