बीड

ल.ना. होशिंग विद्यालयात जागतिक वनदिन उत्साहात साजरा

ल.ना. होशिंग विद्यालयात जागतिक वनदिन उत्साहात साजरा

वनसंवर्धनाशिवाय भविष्य संकटात – वनर‌क्षक सुधीर घोडके

जामखेड प्रतिनिधी – २१जंगलतोडीमुळे वाढते तापमान, नष्ट होत चाललेले वन्यजीव आणि पर्यावरणाच्या होणाऱ्या हानीविषयी सखोल माहिती दिली. “वनांचा ऱ्हास झाल्यास संपूर्ण जिवेतेलाच धोका निर्माण होईल,” वनसंवर्धनाशिवाय भविष्य संकटात असे प्रतिपादन वनरक्षक सुधीर घोडके यांनी केले.

शहरातील दि. पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या ल. ना. होशिंग माध्य व उच्च माध्यमिक विद्यालयात २१ मार्च २०२५ रोजी जागतिक वनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम सभागृहात इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
सदर कार्यक्रम हा प्राचार्य बाळासाहेब पारखे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. तर प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक वनीकरण जामखेड विभागाचे वनरक्षक किसन पवार, सुधीर घोडके हे होते . यावेळी उपमुख्याध्यापक प्रविण गायकवाड, पर्यवेक्षक दत्तात्रय राजमाने, तसेच राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख बबन राठोड हे आदी शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी बोलताना उपमुख्याध्यापक प्रविण गायकवाड म्हणाले की, पर्यावरण , वाढते तापमान,पक्षी आणि प्राणी किती दुर्मिळ होत चालले आहे.त्यांचे रक्षणासाठी विद्यार्थ्यांनी वृक्षारोपणाचा पुढाकार घेण्याचे आवाहन केले. “वाढदिवस झाडे लावून साजरा करा आणि पर्यावरणाचे रक्षण करा,” असा संदेश त्यांनी दिला.
राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख बबन राठोड यांनी विद्यालयात पर्यावरण संरक्षणासाठी राबवलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. वृक्षारोपण, प्लास्टिकमुक्त अभियान आणि जलसंवर्धन यांसारख्या उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एनसीसी विभाग प्रमुख अनिल देडे यांनी केले, तर आभार कलाशिक्षक मुकुंद राऊत यांनी मानले.

Back to top button