बीड

स्व.गोपीनाथरावजी मुंढे साहेबांच्या आदर्शांचा विसर – सुरेश भोसले

स्व.गोपीनाथरावजी मुंढे साहेबांच्या आदर्शांचा विसर – सुरेश भोसले

जामखेड प्रतिनिधी:-सोनेगाव (ता. जामखेड) येथील सामाजिक कार्यकर्ते सुरेश भोसले यांनी बीड जिल्ह्याच्या माजी पालक मंत्री तथा सध्याच्या विद्यमान मंत्री नामदार पंकजाताई मुंढे यांच्या कार्यपद्धतीवर प्रतिक्रिया व्यक्त केली.

तसेच स्व. गोपीनाथराव मुंडे साहेबांनी आपले संपूर्ण आयुष्य गोरगरीब, अल्पसंख्यांक,ओबीसी तसेच ऊसतोड कामगारांसाठी खर्च केले व त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ऊसतोड कामगारांचे महामंडळ स्थापन केले.तसेच त्यांच्या प्रयत्नातूनच बीड जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांचे जीवनमान उंचावले गेले आणि त्यांच्या स्वतःच्या हक्काचा कारखाना असणारावैद्यनाथ सहकारी साखर कारखाना उभा राहिला.

भोसले पुढे म्हणाले की, स्व. मुंडे साहेबांच्या पश्चात आपण अशा स्थितीत कारखान्याच्या विक्रीचा निर्णय घेणे हे मुंडे साहेबांच्या कार्याचा आणि त्यांच्यावर विश्वास ठेवणाऱ्या ऊसतोड कामगारांचा विश्वासघात आहे. ऊस उत्पादक आणि कामगारांना न्याय देण्याऐवजी त्यांची घोर फसवणूक करण्यात आली असून‌ बीड जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक कुटुंबातील प्रमुखांची हत्या झाली असून ही कुटुंबे उघड्यावर पडली आहेत. अतिवृष्टीच्या संकटाने अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले, परंतु आपण अशा कुटुंबांची विचारपूस करण्याचेही औदार्य दाखवले नाही.

भोसले यांनी पंकजाताईंच्या अलीकडील माध्यमांतील वक्तव्यावर म्हटले की,जिल्ह्यावर अतिवृष्टीचे फार मोठे अस्मानी संकट उभे राहिले असताना अनेक कुटुंबांनी दिवाळी साजरी केली नाही, अशा परिस्थितीमध्ये कुटुंबाची साधी भेट घेऊन सहानुभूती देण्याचे सुद्धा औदार्य दाखवले नाही. उलट काही चॅनलवर मुलाखती देऊन माझी लहानपणाची दिवाळी कशी होती, याची चर्चा करण्यात मश्गुल होता.यापेक्षा बीड जिल्ह्यातील लोकांचे काय दुर्दैव असू शकते.भोसले यांनी शेवटी प्रश्न उपस्थित केला की,स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या तत्त्वांवर चालणाऱ्या पंकजाताईंनी त्यांच्या स्मृतींना साजेसे काम करण्याऐवजी त्यांच्या आदर्शांचा विसर का पडला?

Back to top button