बीड

भाजपा गेवराई तालुका अध्यक्ष पदासाठी इच्छुकांची गर्दी,प्रक्रिया संपन्न.

भाजपा गेवराई तालुका अध्यक्ष पदासाठी इच्छुकांची गर्दी,प्रक्रिया संपन्न.
आज दि.08 एप्रिल रोजी,भाजपा तालुका कार्यालय,गेवराई (जुन्या बसस्टँड च्या बाजूला) येथे भाजपा, गेवराई तालुका अध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया पार पडली. यासाठी तालुका निरीक्षक म्हणून मा.सौ. उषाताई मुंडे, व मा.श्री.आदित्यजी सारडा यांची पक्षाकडून नियुक्ती करण्यात आली होती. कार्यालयात त्यांचे गेवराई तालुका भाजपच्या वतीने गेवराई विधानसभा समन्वयक श्री. श्रीकांत सानप, गेवराई तालुकाध्यक्ष श्री प्रकाश काका सुरवसे व श्री.सुरेशजी हात्ते यांनी स्वागत केले.
लोकशाही व पारदर्शक पद्धतीने, भाजपा गेवराई तालुक्यातील एकूण 23 इच्छुक उमेदवारांनी नाव नोंदवून स्वतःचे मत मांडून व आपल्या मुलाखती मा.तालुका निवडणूक निरीक्षक यांच्या समोर दिल्या आहेत. सर्व माहिती, अहवाल मा.तालुका निरीक्षक यांच्याद्वारे पक्षाकडे पाठवला जाईल. तसेच तालुक्यातील सर्व इच्छुक उमेदवार व प्रमुख कार्यकर्त्यांच्या सर्वानुमते गेवराई तालुका अध्यक्ष पद निवडीसाठीचे सर्वस्वी अधिकार भाजपा नेत्या, राज्याच्या मंत्री नामदार पंकजा मुंडे यांच्यावर सोपवले आहेत.
तालुका अध्यक्ष पदाच्या इच्छुक उमेदवारांमध्ये उद्धव रासकर, राहुल राका, राजेश पवार, ईश्वर पवार, श्यामसुंदर कुंड, महादेव धोंडरे, ईब्राहीम शेख, अशोक शिंदे, विलास शिंदे, दीपक सुरवसे, विकास पवार, सचिन दाभाडे, बळीराम कऱ्हे, कृष्णा ढाकणे, सुरेश हात्ते, बाळू उबाळे, सत्यम पवार, सुघोष मुंडे, प्रकाश सुरवसे, प्रशांत राख,श्रीकांत सानप,गणेश सातपुते,पी टी चव्हाण उपस्थित होते व त्यांनी मुलाखती दिल्या.
वरील सर्व प्रक्रियेचा भाग आहे, तालुका अध्यक्षपदी जरी एकच व्यक्ती निवडला जाणार असला तरी, पक्षाचे कार्य सर्वांना एकत्र येऊनच करायचे आहे. व गेवराई तालुक्यात भाजप आणखी बळकट करायचा आहे. तालुका अध्यक्ष निवडीनंतर लवकरच तालुका पदाधिकारी नियुक्त्या होणार आहेत. असे भाजपाचे विधानसभा समन्वयक श्रीकांत सानप यांनी सांगितले. तसेच त्यांनी तालुका अध्यक्ष पदाचे उमेदवार व तालुका पदाधिकारी साठी असणाऱ्या सर्व इच्छुकांना शुभेच्छा दिल्या.
Back to top button