संपादकीय

“सत्य हे अस्तित्वातच असतं. असत्य हे सतत पटवून द्यावं लागतं” भाजपचा मलिक आणि राऊतांना टोला

 

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी थेट एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला आहे. याच मुद्दयावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध सुरु झाले आहे तर दुसरीकडे मलिक यांच्यापाठोपाठ शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सुद्धा भाजपवर निशाणा साधला आहे. आता या आघाडीच्या दोन्ही नेत्यांच्या टीकेला भाजपने प्रतिउत्तर दिले आहे.

“सत्य हे अस्तित्वातच असतं. असत्य हे सतत पटवून द्यावं लागतं” असं सणसणीत टोला लगावला आहे. भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी “‘नवाबी’ पत्रपरिषदांना एकच पण ‘सॉलिड’ उत्तर दिलं; आता तुम्हीच ठरवा चिखलात कोणाला लोळवलं?” असा सवाल विचारला आहे. केशव उपाध्ये यांनी “सत्य हे अस्तित्वातच असतं! असत्य हे सतत पटवून द्यावं लागतं… म्हणूनच ३० वर ‘नवाबी’ पत्रपरिषदांना एकच पण ‘सॉलिड’ उत्तर दिलं गेलं! आता तुम्हीच ठरवा चिखलात कोण लोळत होतं? (तसंही रोज सकाळी दिसला बुम की चिखलफेक करत हे अख्ख्या महाराष्ट्राला ठावूक आहेच की)” असं म्हटलं आहे.

प्रख्यात नाटककार जॉर्ज बर्नार्ड शॉ यांचे एक वाक्य ट्विट करून विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्या आरोपांची खिल्ली उडविली. या आरोपांना फारसे महत्त्व देण्याची गरज नाही, असे ते म्हणाले.’मी फार पूर्वीच शिकलो की, एखाद्यासोबत

Back to top button