संपादकीय

गोपीचंद पडळकरांनी शेअर केली मनिषा कायंदेंची कॉल रॅकॉर्डिंग

 

मुंबई | शिवसेना नेत्या मनिशा कायंदे एका माध्यमांच्या चर्चासत्रात भाग घेतला होता. या चर्चेनंतर काही एसटी कामगारांनी त्यांना फोन करुन त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. याबाबत भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी या कर्मचाऱ्यांनी मनिषा कायंदे यांच्याशी केलेल्या संवादाची कॉल रेकॉर्डिंग ट्विट केली आहे.

गोपीचंद पडळकर ट्विट करत म्हणाले, स्व.बाळासाहेबांच्या शिवसैनिकांची अवस्था काय केली गेलीये, ऐका त्याच्याच तोंडून… शिवसेनेच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी न्यूज १८ च्या एका चर्चासत्रात सहभाग नोंदवत एसटी कर्मचाऱ्यांनी संप थांबवावा असे आवाहन केले होते. यानंतर त्यांना मोठ्या प्रमाणावर एसटी कर्मचाऱ्यांसह काही भाजपा पुरस्कृत कर्मचाऱ्यांनी कॉल करुन गलिच्छ भाषा वापरली होती. यावर मनिषा कायंदे यांनी राज्याच्या महिला आयोगाकडे तक्रारही केली होती.

दरम्यान, आज गोपीचंद पडळकर यांनी शेअर केलेल्या कॉल रेकॉर्डिंगमध्ये राजकुमार कोरे नावाचा कर्मचारी मनिषा कायंदेंशी संवाद साधताना म्हणाला, मी पुण्याच्या मध्यवर्ती बसस्थानकात कामाला आहे. टीव्हीवर तुमची चर्चा ऐकली, तुम्ही आम्हाला आवाहन केले कामावर या, मग आम्हाला कायद्यानुसार वेतन का दिलं जात नाही? दोन वर्षांपासून तुमची सत्ता आहे, अनिल परबने एकही रुपया वाढवून दिलं नाही. मी तुमचं नाव लिहून आत्महत्या करतो. तुम्ही खोटारडं राजकारण करत आहात. मला या प्रश्नाचं उत्तर द्या फोन अजिबात कट करु नका, या प्रश्नाचं उत्तर द्या, यावर मनिषा कायंदे इतकच म्हणाल्या, ऐकतीये मी. असे उत्तर मनीषा कायंदे यांनी दिले होते. या टीकेला मनीषा कायदे काय प्रतिउत्तर देतायत हे पाहावे लागणार आहे.

Back to top button