संपादकीय

मनपाची कर्मचाऱ्यांची दमदार कामगिरी मुंबईत १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना पहिला डोस मिळाला

 

मुंबई | कोरोनच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात युद्ध पातळीवर लसीकरण मोहीम आरोग्य खाते आणि मुंबई महानगर पालिकेने हाती घेतले होते. त्यातच आज मुंबईतून लसीकर संदर्भात एक दिलासादायक वृत्त समोर येत आहे. मुंबईत आज १८ वर्षांवरील वयोगटातील १०० टक्के नागरिकांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्याचे उद्दिष्ट गाठले आहे. शनिवारी सकाळी मुंबईत ९२ लाख ३६ हजार ५०० वी लस देण्यात आली. याचबरोबर सर्व नागरिकांना पहिला डोस दिला गेला आहे.

मुंबईची लोकसंख्या पाहता हे लक्ष्य एवढे लवकर गाठणे कठीण होते. यासाठी मुंबई महापालिका, राज्य सरकार आणि केंद्र सरकारने मिळून प्रयत्न केले. लसीचा तुटवडा असताना तसेच केंद्र सरकारने राज्यांवर लसी विकत घेण्याची जबाबदारी टाकलेली असताना मुंबई महापालिकेने स्वत: लसी विकत घेण्याची तयारी केली होती. तसेच लसीकरणाची मोठी मोहिम राबविली होती.

मुंबईसह देशभरात १६ जानेवारीला लसीकरण मोहीम सुरु झाली. सर्वप्रथम आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी लसीकरण सुरु झाले होते. त्यानंतर फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांसाठी 5 फेब्रुवारी २०२१ ला ६० वर्ष वयावरील तसेच ४५ ते ५९ वयोगटातील सहव्याधी असलेल्या नागरिकांसाठी १ मार्च, ४५ वर्ष वयावरील सर्व नागरिकांसाठी १ एप्रिल १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी दिनांक 1 मे 2021 पासून लसीकरण सुरु करण्यात आले.

Back to top button