बीड

युवा नेते अक्षय मुंदडाची संवेदनशीलता युध्दजन्य परिस्थितीमुळे वाढदिवसाचे कार्यक्रम रद्द केले, चला हवा येऊद्या कार्यक्रम पुन्हा होणार, शहराध्यक्ष संजय गंभीरे यांची माहिती

युवा नेते अक्षय मुंदडाची संवेदनशीलता

युध्दजन्य परिस्थितीमुळे वाढदिवसाचे कार्यक्रम रद्द केले, चला हवा येऊद्या कार्यक्रम पुन्हा होणार, शहराध्यक्ष संजय गंभीरे यांची माहिती

अंबाजोगाई (प्रतिनिधी) : दि.भारतीय जनता पार्टीचे युवा नेते अक्षय मुंदडा यांनी स्वतःच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेले सर्व कार्यक्रम देशात सुरू असलेल्या युध्दजन्य परिस्थितीमुळे रद्द केले असून कुठलेही जाहीर कार्यक्रम होणार नसल्याचे संयोजकांनी सांगितले. दरम्याण चला हवा येऊ द्या आणि मराठी पाऊल पडतेत पुढे. दोनही कार्यक्रम युध्द संपल्यानंतर निश्चित घेवू अशी माहिती भाजपा चे शहराध्यक्ष संजय गंभीरे यांनी दिली. राजकारण करताना देशभक्तीतली संवेदनशिलता कशी जपल्या जाते याचे आदर्श उदाहरणच म्हणावे लागेल.
उद्याच्या 13 मे रोजी भाजपा चे युवा नेते अक्षय मुंदडा यांचा वाढदिवस असून त्यानिमित्ताने शहरात कार्यकर्त्यांनी विविध कार्यक्रमाचे केले होते. ज्यामध्ये चला हवा येऊद्या, प्रसिध्द अभिनेते निलेश साबळे यांचा कार्यक्रम तर मराठी पाऊल पडते पुढे आदी सांस्कृतिक कार्यक्रम 13 मे ला शहरात होणार होता. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पुर्व तयारी जोरदार केली होती. त्यासाठी मध्यवर्ती असलेल्या सेंट अँथोनी शाळेचे मैदान पण निवडले होते. मात्र दोन दिवसापासून पाकिस्थान सोबत सुरू झालेले युध्द त्यानंतर संपूर्ण देशात निर्माण झालेल्या युध्दजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अक्षय मुंदडा यांनी स्वतःच वाढदिवसानिमित्त आयोजित केलेले सर्व कार्यक्रम रद्द करण्याच्या सुचना आपल्या सहकारी कार्यकर्त्यांना केल्या असून कोणीही मोठा गाजावाजा करत कार्यक्रम करू नये असे सांगितले त्यामुळे चला हवा येऊद्या हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. दरम्याण सद्यस्थितीत कार्यक्रम रद्द झाला असला तरी, याच सांस्कृतीक कार्यक्रमाची मेजवाणी आम्ही निश्चितच युध्दजन्य परिस्थिती संपल्यानंतर शहरवासियांना देणार असल्याचे भाजपाचे शहराध्यक्ष संजय गंभीरे यांनी सांगितले. दि. 22 एप्रिल रोजल पाकिस्थानी दहशतवादी पहलगाम येथे दुष्कर्म घडवले होते ज्यांला पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली दृढ निश्चय तथा सैनिकाच्या शौर्याने योग्य उत्तर देणे चालू आहे. मात्र या सर्व पार्श्वभूमीवर वाढदिवस साधेपणाने साजरा करण्याचे मुंदडांनी कळवत आपल्यातली संवेदनशीलता दाखवली.

Back to top button