एकता फाउंडेशन करणार गुणवंतांचा सन्मान [पाथर्डी तालुका शाखेचा अभिनव उपक्रम]

एकता फाउंडेशन करणार गुणवंतांचा सन्मान
[पाथर्डी तालुका शाखेचा अभिनव उपक्रम]
अहिल्यानगर (प्रशांत बाफना) : पाथर्डी शहर व तालुक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा एकता फाउंडेशन पाथर्डी तालुका शाखेच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती तालुका शाखेचे अध्यक्ष कवी राजेंद्र उदारे यांनी दिली. एकताचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष पत्रकार बाळासाहेब कोठुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे असे एकताचे शेवगाव तालुकाध्यक्ष कवी प्रदीप बोडखे यांनी प्रसार माध्यमांना सांगितले. म.सा.प.चे माजी कोषाध्यक्ष तथा ग्रामीण कथाकार प्रा.डाॅ.भास्कर बडे, मराठवाडा साहित्य परिषद संभाजीनगर केंद्रीय कार्यकारिणी सदस्य तथा एकता फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष जेष्ठ साहित्यिक अनंत कराड, सचिव पत्रकार गोकुळ पवार, कोषाध्यक्ष शिवलिंग परळकर, प्रदेश प्रवक्ता मल्हारी खेडकर, जेष्ठ कवी रूपचंद शिदोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर सोहळा नंदकिशोर आयुर्वेदिक औषधालयात संपन्न होणार आहे.
संत तुकडोजी महाराज आदर्श पत्रकार पुरस्कार प्राप्त पत्रकार मा.अविनाश मंत्री, स्व.दादासाहेब रूपवते सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार प्राप्त मा.हाजी हुमायून आतार, संत तुकडोजी महाराज काव्य भूषण पुरस्कार प्राप्त कवी आत्माराम शेवाळे, अंधश्रद्ध निर्मूलन समितीचे नवनिर्वाचित कार्याध्यक्ष मा.शशिकांत गायकवाड, इ.१२वी वाणिज्य शाखा द्वितीय क्रमांक प्राप्त विद्यार्थीनी मधुरा रामनाथ बंग या गुणवंतांचा एकता फाउंडेशन च्या वतीने सन्मान करण्यात येणार असून यावेळी शिवव्याख्याते सचिन नागपुरे, अदिनाथ डोमकावळे (अध्यक्ष, पावन गणपती प्रतिष्ठान), माजी नगरसेवक रामनाथ बंग (अध्यक्ष, जेष्ठ नागरिक संघ), कृष्णा रेपाळ (उपाध्यक्ष, एकता फाउंडेशन, पाथर्डी), ह.भ.प.अमोल महाराज सोळसे (कार्याध्यक्ष), सुभाष भागवत (सचिव), योगेश इधाटे (कोषाध्यक्ष), प्रदीप काटे (संघटक), पत्रकार अनिल खाटेर (प्रसिद्धीप्रमुख), कार्यकारिणी सदस्य डाॅ.नंदकिशोर औटी, आत्माराम शास्त्री बिडवे, सुखदेव मर्दाने, मेजर नवनाथ तरटे, आनंद पंडागळे, बाळासाहेब चिंतामणी आदी मान्यवर कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.



