रायगड

कोण होणार रायगडचा पालकमंत्री.. रायगडच्या जनतेला वाली कोण..

कोण होणार रायगडचा पालकमंत्री.. रायगडच्या जनतेला वाली कोण..

पालक मंत्री पदावरून तिडा कायम.. दोन्ही पक्ष दावेदार.. आणि जनता बेजार..

द. रा. जि. उपसंपादक:संतोष उध्दरकर.

म्हसळा : विधानसभा निवडणुका होऊन गेली सहा महिने उलटून गेले तरी पण रायगड जिल्हयाचा पालकमंत्री पद रिक्त असल्याने सर्व सामान्य जनतेला वाली कोण असा सर्व सामान्य जनतेमधुन लोकप्रतिनिधी यांना प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे, संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहीलेले विधान सभा निवडणुक ही रायगडची सरस ठरली होती, या रायगडमध्ये दोन आमदार, दोन मंत्री असुन सुद्धा पालकमंत्री पदाचा तिढा सुटत नसल्याचे चित्र दिसुन येत आहे, सत्ता असून देखील रायगडला पालकमंत्री पदापासुन वंचित ठेवण्याचे काम सुरु आहे असे विरोधकांचे म्हणने आहे. सत्ता मधील दोन्ही पक्ष दावेदार… आणि सामान्य जनता बेजार असेच काहिसे बोलले तर वावगे ठरणार नाही. रायगडला पालकमंत्री मिळत नसल्याने प्रशासनावर कुणाचेच अंकुश नाही आहे तसेच स्थानिक समिती, समन्वय समिती, अशा प्रकारे समिती स्थापन करणे अवघड झाले असल्याने प्रशासनाला जाब विचारणारे कुणीच नाही त्यामुळे जनतेची छोटी छोटी कामे यांना गती मिळत नाही.त्यामुळे रायगडला लवकरात लवकर पालकमंत्री मिळावा ही सर्व सामान्य जनतेची मागणी आहे.
काय रायगडचा पालकमंत्री पदाचा तिढा सुटेल… कि.. सरकारी काम… अजुन सहा महिने थांब… अशी अवस्था होईल…?

————————————-
रायगडला पालकमंत्री नसल्यामुळे जनतेची विकासात्मक कामे पूर्ण पणे रखडलेली आहेत. रस्ता आहे साईड पट्टी तशीच, पावसाळा पूर्वी महावितरण यांची कामे अपूर्ण, काही शासकीय कार्यालय, ग्रामीण रुग्णालय रिक्त पदे अपूर्ण, शासकीय कार्यालय आहे पण कर्मचारी नसणे असे एक ना अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे लवकरच रायगडला पालकमंत्री मिळाला.

रविंद्र लाड.माजी सभापती.

Back to top button