बीड
अवैद्यरीत्या दारू विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या वर पोलिसांची कारवाई

अवैद्यरीत्या दारू विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या वर पोलिसांची कारवाई
अंबाजोगाई प्रतिनिधी:-बीड पोलीस अधीक्षकाचा कार्यकाल सांभाळल्या पासून माननीय नवनीत कावत यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्ह्यातील अवैद्यरीत्या धंदे करणाऱ्यावर पोलिसांची जरब बसली आहे.असे दिसून येते याच अनुषंगाने
आज अंबाजोगाई दिनांक 9 जुलै रोजीअंबाजोगाई येथील शहर पोलीसांना मिळालेल्या बातमीच्या आधारे पोलिसांनी अंबाजोगाई शहरातील नगरपरिषद समोरील वाईन शॉप मधून श्रीकृष्ण लहूदास साखरे वय 40 वर्ष राहणार चिंचपूर तालुका धारूर व अन्य एक इसम अवैद्यरित्या दारू विक्री करण्यासाठी घेऊन जात असल्याची माहिती अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचारी यांना मिळताच त्यांनी केलेल्या कारवाईत देशी व विदेशी दारू सोबत दोन मोटरसायकल अंदाजे किंमत 92 हजार 650 किमतीचा मुद्देमाल त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आला पुढील कारवाई सुरू होती.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक बीड नवनीत कावत, अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती चेतना तिडके, डीवायएसपी अनिल चोरमले, तुमच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शरद जोगदंड सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिंदे पोलीस अंमलदार हनुमंत चादर भागवत नागरगोजे मनोज वाघ बाळासाहेब पारवे अमोल वाहूळे आदी कर्मचाऱ्यांकडून ही कारवाई करण्यात आली



