राजकीय

गोसावीच्या बॉडीगार्डचे एनसीबीविरोधात खळबळजनक दावे, मलिक म्हणतात की,

 

मुंबई | सध्या राज्यात ड्रग्स प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शीतयुद्ध सुरु झालेले पाहायला मिळत आहे. या प्रकरणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबेव्हर अनेक गंभीर आरोप लगावले होते. तर दुसरीकडेकेपी गोसावी यांचा बॉडीगार्ड प्रभाकर साळी यांनी ड्रग्ज संदर्भात एनसीबीविरोधात अनेक गौप्यस्फोट केले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

या प्रकरणाची गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी दखल घ्यावी. तसेच या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे. गृहमंत्री आणि पोलीस आयुक्तांना भेटून ही मागणी करणार असल्याचंही मलिक यांनी सांगितलं.

नवाब मलिक यांनी मीडियाशी संवाद साधताना प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. समीर वानखेडे खोट्या केसेस बनवून लोकांना अडकवत आहेत. दहशत निर्माण करत आहेत. वसुली सुरू आहे हे मी आधीपासूनच सांगत आहे. आता त्यांचाच पंच समोर आला असून त्यानेच गौप्यस्फोट केले आहेत. याबाबत पोलीस आयुक्त आणि गृहमंत्र्यांशी बोलणार. या शहरात ऑर्गनाईज क्राईम सुरू आहे.

पुढे बोलताना मलिक म्हणाले की, आजवर अनेक लोकांनी हजारो कोटी रुपये वसूल केले आहेत. कुठे तरी या घटनेची दखल घेऊन त्याची एसआयटी मार्फत चौकशी केली पाहिजे. याबाबत मी मागणी करणार आहे. उद्या रात्री मुंबईत आल्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि पोलीस आयुक्तांना भेटून ही मागणी करणार आहे, असं मलिक यांनी सांगितलं होत.

Back to top button