बीड
बीडच्या कृष्णा गायकवाडची अंडर-१४ महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड

बीडच्या कृष्णा गायकवाडची अंडर-१४ महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड
बीड जिल्हा क्रिकेट असोसिएशनकडून अभिनंदन
बीड (प्रतिनिधी)
दि.१९ : बीड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा होतकरू खेळाडू कृष्णा गायकवाड याची १४ वर्षांखालील (अंडर-१४) महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड झाली असून, या उल्लेखनीय यशाबद्दल क्रीडा क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. कृष्णा गायकवाडने सातत्यपूर्ण मेहनत, शिस्तबद्ध सराव आणि उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर राज्य संघात स्थान मिळवले आहे.
कृष्णा गायकवाडच्या या यशाबद्दल बीड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, डॉ. योगेश क्षीरसागर, सचिव आमेर सलीम यांच्यासह महेश वाघमारे, राजन साळवी, इरफान कुरेशी, मनोज जोगदंड, जावेद पाशा, रिजवान खान, जैतुल्ला खान, सिद्दीक देशमुख, संजय उडान, शुभम धुत, शेख आरेफ, अतीक कुरेशी, सुनील गोपी शेट्टी, गोपाल गुरखूदे, सरफराज मोमीन, अक्षय नरवडे, पठाण शाहरुख आदी पदाधिकारी व सदस्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. कृष्णा गायकवाडची ही निवड बीड जिल्ह्यासाठी अभिमानास्पद असून, भविष्यात तो राज्य व राष्ट्रीय स्तरावर नावलौकिक करेल, असा विश्वास क्रीडाप्रेमींनी व्यक्त केला आहे.



