मुख्य लेखा व वित्त अधिकारी मारुती मुळे यांना मातृशोक

मुख्य लेखा व वित्त अधिकारी मारुती मुळे यांना मातृशोक
जामखेड प्रतिनिधी : जामखेड तालुक्यातील आदर्श प्रशासकीय अधिकारी मारुती बा.मुळे (मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक) यांच्या मातोश्री सौ. द्रोपदाबाई बाबुराव मुळे (वय ९६) यांचे दिनांक ३ डिसेंबर २०२५ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने मुळे कुटुंबीयांसह जामखेड परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
द्रोपदाबाई मुळे यांच्या मागे एक मुलगा, चार मुली व नातवंडे असा मोठा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते प्रा. लक्ष्मणराव ढेपे यांच्या त्या आत्या होत, तर दुखवटा प्रा. अंजली लक्ष्मणराव ढेपे (माजी सरपंच, महारूळी) व ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
त्यांचा अंत्यविधी त्यांच्या मूळ गावी महारूळी (नान्नज), ता. जामखेड, जि. अहिल्यानगर येथे पार पडला. सावडायचा कार्यक्रम गुरुवार, दि. ४ डिसेंबर २०२५ रोजी मुळे वस्ती, महारूळी येथे आयोजित असून, दशक्रिया विधी शुक्रवार, दि.१२ डिसेंबर २०२५ रोजी श्री क्षेत्र सिद्धटेक, ता. कर्जत येथे होणार आहे.



