📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

बीडच्या संत सावता महाराज मंदिराच्या सभागृहासाठी भरीव निधी देणार

बीडच्या संत सावता महाराज मंदिराच्या सभागृहासाठी भरीव निधी देणार
*ना.पंकजाताई मुंडे यांची ग्वाही; माळी समाज बांधवांनी केला हृदय सत्कार*
बीड दि.१६ —-
बीडमधील संत सावता महाराज मंदिर परिसरातील सभागृह, भव्य डोम तसेच आवश्यक पायाभूत सुविधांच्या विकासासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून दोन टप्प्यात भरीव निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज येथे दिली.
बीड शहरातील संत सावता महाराज मंदिरात ट्रस्टकडून ना.पंकजाताई मुंडे यांचा रविवारी (दि.१६) सत्कार करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी माजी खासदार डॉ.प्रितमताई मुंडे, भाजप नेते डॉ.योगेश क्षीरसागर, बीड नगरपरिषदेच्या भाजप गटनेत्या डॉ.सारिकाताई क्षीरसागर, नगरसेवक शुभम धूत, सावित्री नितीन साखरे, ट्रस्टचे पदाधिकारी नामदेव दुधाळ, मोहन गोरे, शामसुंदर घाडगे, समता परिषद जिल्हाध्यक्ष निखिल शिंदे, शहराध्यक्ष नितीन राऊत, महात्मा फुले युवा दलाचे अध्यक्ष ॲड. सतीश शिंदे, दिनकर जमदाडे, सिताराम पानखडे, सचिन दुधाळ, रमेश दुधाळ, विष्णू यादव, महेश राऊत, बाळासाहेब धोत्रे, मंगेश जमदाडे, महेश चौधरे, संतोष गवळी, सुबोध शिंदे, छाया लांडगे, अलका राऊत, चित्रा घाडगे, आशा गोरे, मंदा राऊत, प्रियांका गोरे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना ना.पंकजाताई मुंडे म्हणाल्या की, संत सावता महाराज मंदिराची पायाभरणी सुरू असताना आपण या ठिकाणी आले होते. मंदिरासाठीची जागा माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी उपलब्ध करून दिली. आता मंदिर परिसराच्या विकासासाठी डॉ.योगेश क्षीरसागर हे पाठपुरावा करत आहेत. त्यांच्यासह सहकाऱ्यांनी भव्य डोमच्या बांधकामासह विविध सुविधांसाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. समाजाची मागणी आणि मंदिर परिसराच्या विकासाची गरज लक्षात घेऊन जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून दोन टप्प्यांत भरीव निधीची तरतूद करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. संत सावता महाराज मंदिर परिसराच्या विकासामुळे भाविकांसह समाजबांधवांना विविध सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार असून, समाजपयोगी उपक्रमांसाठी सभागृह उपयुक्त ठरणार आहे, असेही त्या म्हणाल्या. यावेळी विविध पक्ष व संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट
*डॉ.क्षीरसागरांसह पदाधिकाऱ्यांनी मुंबईत भेटून दिले होते आमंत्रण*
——
भाजप नेते डॉ.योगेश क्षीरसागर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मंत्री पंकजाताई मुंडे यांची भेट घेऊन बीड शहरातील संत सावता महाराज मंदिराला भेट देण्याचे आमंत्रण दिले होते. त्यानुसार पंकजाताई मुंडे यांनी मंदिराला भेट देऊन सत्कार स्वीकारला. तसेच मंदिर परिसराच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
••••
Back to top button