बीड

मनसे जनतेच्या सेवेला!’ म्हसळात राजसाहेबांच्या ‘पाणीदूतांचा’ डंका; वारळ गावाची तहान भागवली

मनसे जनतेच्या सेवेला!’ म्हसळात राजसाहेबांच्या ‘पाणीदूतांचा’ डंका; वारळ गावाची तहान भागवली
​धगधगत्या उन्हात मनसेचा थेट मदतीचा हात; टंचाईग्रस्त गावांना संपर्क साधण्याचे जाहीर आवाहन
​म्हसळा (संदेश घोलप ):
महाराष्ट्रात सध्या भीषण पाणीटंचाईने होरपळणाऱ्या जनतेला लोकप्रतिनिधींनी वाऱ्यावर सोडले असून, हेच तथाकथित नेते सध्या सत्तेच्या सारीपाटावर मलिदा खाण्यात मश्गूल आहेत. मात्र, ‘राजनिती नंतर, आधी समाजकारण’ हाच बाणा जपत “राजसाहेबांचे पाणीदूत नेहमीच अग्रस्थानी असतात” ही घोषणा मनसेने पुन्हा एकदा कृतीतून सिद्ध केली आहे. दक्षिण रायगडमधील म्हसळा तालुक्यातील तीव्र पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या ‘वारळ’ ग्रामस्थांच्या हाकेला ओ देत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने थेट गावात पाण्याचे टँकर उतरवून विरोधकांच्या नाकावर टिच्चून पाणीपुरवठा सुरू केला आहे.
​दिलीप सांगले साहेबांचे अथक प्रयत्न; मनसे फौज मैदानावर!
​वारळ गावातील जनते पाण्यासाठी वणवण फिरत असताना, मनसे दक्षिण रायगड जिल्हा संपर्क अध्यक्ष श्री. दिलीप सांगले साहेब यांनी या समस्येची गंभीर दखल घेतली. त्यांच्या अथक प्रयत्नांतून आणि उप जिल्हाध्यक्ष श्री. मृदासभाई तोंडलेकर व श्री. सुमित अंकुश सावंत, म्हसळा उप तालुकाध्यक्ष श्री. सुभाष कदम साहेब, श्री. पप्पू जावळे, श्री. राहुल काते, श्री. रूपेश साळुंखे यांच्या धडाकेबाज पुढाकाराने तात्काळ पाणीपुरवठा मोहीम युद्धपातळीवर हाती घेण्यात आली.
​स्थानिक पदाधिकाऱ्यांचा आक्रमक पाठपुरावा
​सत्तेत बसलेले लोक डोळे झाकून बसले असताना, वारळ गावच्या मनसे स्थानिक पदाधिकाऱ्यांनी दाखवलेली तत्परता कौतुकास्पद ठरली. येथील मनसेचे खंदे शिलेदार श्री. मिथुन पाटील, श्री. वैभव चाळके, श्री. वैभव पाटील, श्री. उदय धुमाळ, श्री. विश्वनाथ कवीलकर, श्री. चेतन पाटील, श्री. विलास पाटील, श्री. संजय माळी यांच्या सुचनेनुसार आणि आक्रमक पवित्र्यामुळेच गावात तात्काळ पाणी पोहोचू शकले. मनसेच्या या पाणीदूतांना पाहून वारळ ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर हसू उमलले असून महिलांनी मनसे सैनिकांचे आभार मानले.
​”जोपर्यंत टंचाई हटत नाही, तोपर्यंत पाणी थांबणार नाही!”
​मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सत्तेतील नेत्यांना जाहीर आव्हान देत ठणकावून सांगितले आहे की, “जोपर्यंत वारळ गावाची पाणीटंचाई समूळ नष्ट होत नाही, तोपर्यंत राजसाहेबांच्या पाणीदूतांकडून पाण्याचा पुरवठा अविरतपणे सुरूच राहील. जनतेला थेंब थेंब पाण्यासाठी तरसवणाऱ्या सत्ताधाऱ्यांचे मुखवटे आता गळून पडले आहेत.”
​”निवडणुका आल्या की मतांची झोळी पसरवून फिरणारे इतर पक्षांचे नेते आज जनतेला पाणी देण्यासाठी गायब आहेत. हे सगळे फक्त सत्तेचा मलिदा खाण्यासाठी एकत्र आले आहेत. मनसे सत्तेत असो वा नसो, जनतेच्या न्याय्य हक्कासाठी आणि त्यांच्या मूलभूत गरजांसाठी सदैव कार्यतत्पर आहे आणि राहील!”
– मनसे दक्षिण रायगड पदाधिकारी
​पाणीटंचाई आहे? मग थेट मनसेशी संपर्क करा!
​म्हसळा तालुका आणि दक्षिण रायगड परिसरातील इतर कोणत्याही गावात जर पाण्याची भीषण टंचाई असेल आणि प्रशासन सुस्त असेल, तर ग्रामस्थांनी वेळ न घालवता थेट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या खालील अधिकृत संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा. मनसेचे पाणीदूत तुमच्या दारात पाणी पोहोचवतील, अशी ग्वाही पक्षाकडून देण्यात आली आहे.
Back to top button