संपादकीय

रांजणी च्या गोरांक्ष गोरकरचे डान्स स्पर्धेत यश बक्षीस म्हणून मिळाली सायकल

रांजणी च्या गोरांक्ष गोरकरचे डान्स स्पर्धेत यश

बक्षीस म्हणून मिळाली सायकल

बीड प्रतिनिधी

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून लहान मुलांच्या डान्स स्पर्धा द २४ जानेवारी रोजी  रॉयल इंटरनॅशनल स्कूल सीबीएसई डोंबिवली

स्कूल येथे घेण्यात आल्या होत्या. त्यामध्ये रांजणी तालुका गेवराई जिल्हा बीड येथील गोरांक्ष शुभम गोरकर याने तिसरा क्रमांक घेतला. त्याने मराठी गाण्यावर भंडारा उधळीत या गाण्यावर डान्स केला होता. त्याला बक्षीस म्हणून  सायकल मिळाली आहे.

यावेळी त्याचे वडील शुभम सुधाकर गोरकर व त्याची आई पूजा गोरकर हे  उपस्थित होते. त्याची आई पूजा गोरकर म्हणाल्या माझे एक स्वप्न आहे माझ्या मुलाने डान्स मध्ये खूप प्रगती करावी. या यशाबद्दल  गोरंक्ष गोरकर चे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.  त्याची आजी आजोबा सुधाकर गोरकर, स्वाती गोरकर, सचिन गोरकर, गीतांजली जोशी आदींचा अभिनंदन केले.

Back to top button