📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

अंगणवाडीच्या सेवा व उद्दिष्टे बंद असल्याने बाळाचा मृत्यू ! _ प्रकल्प अधिकारी, कनिष्ठ अधिकारी व अपात्र उमेदवार जवाबदार – पालक

अंगणवाडीच्या सेवा व उद्दिष्टे बंद असल्याने बाळाचा मृत्यू !
_ प्रकल्प अधिकारी, कनिष्ठ अधिकारी व अपात्र उमेदवार जवाबदार – पालक
_ वैद्यकीय नुकसान भरपाई देऊन, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा – गावकरी_
 प्रतिनिधी:-एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत, मौजा शंकरपुर/वडेगांव येथील मिनी अंगणवाडी केंद्र – शंकरपुर येथे, नुकत्याच काही महिन्यांपूर्वी अंगणवाडी मदतनीस पदाकरिता भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. मात्र भरती प्रक्रियेत नियमबाह्य उमेदवार, कु. वर्षा पंढरी लांजेवार हिने अर्ज सादर केले असता, गावकऱ्यांनी तिची समजूत घालून काढली. मात्र सदर उमेदवार नियमांचे उल्लंघन करत आपल्या निर्णयावर ठाम राहिली.
          तथापि, सदर भरती प्रक्रिया पूर्णपणे गैरपद्धतीने राबविली गेली असून, आयसीडीएसचे सहा सेवा व पाच उद्दिष्टे खंडीत होऊन माता-बालकांची गैरसोय होईल; करिता शंकरपुर हे आदिवासी क्षेत्र असल्याने त्यांचे प्राधान्य लक्षात घेऊन स्थानिक पातळीवरीलचं उमेदवाराची निवड करावी. असे सामूहिक अर्ज, ग्रा.पं. वडेगांव, एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प साकोली, तहसील कार्यालय साकोली, आमदार कार्यालय साकोली व जिल्हा परिषद भंडारा येथील संबंधित अधिकार्यांना वेळेत सोपविले होते.
          मात्र, गावकऱ्यांचे अर्ज फेटाळून, आयसीडीएस येथील अधिकाऱ्यांनी पात्र उमेदवारांना डावलून, अपात्र उमेदवाराची नियुक्ती केली, अंतः न्याय न मिळाल्याने संतप्त गावकऱ्यांनी तीव्र रोष व्यक्त करत, अंगणवाडी ला कुलूप ठोकले; ज्याअर्थी आयसीडीएसच्या सहा सेवा व पाच उद्दिष्टांचे लाभ गावकऱ्यांस मिळणे बंद झाले. सदर प्रकरणाला चार महिने लोटले, मात्र; कुठलीही सकारात्मक कार्यवाही आयसीडीएस कडून करण्यात आली नाही.
          पोषक तत्वांचा पुरवठा खंडीत झाल्याने, दि. १० जुलै च्या सकाळी, रेखा जितेंद्र वाढवे (३०) या गरोदर मातेला त्रास व फरक जाणविले असता, पती जितेंद्र बाजीराव वाढवे (३३) यांना माहिती दिली. प्राथमिक उपचाराकरिता रुग्णवाहिका देखील नसल्याने त्यांनी मोटरसाइकिलने उपजिल्हा रुग्णालय गाठले ! दि. ११ जुलै रोजी, गर्भातील गर्भजल कमी झाल्याने चार महिन्यांच्या बाळाचे गर्भातचं मृत्यू झाल्याचे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बडवाईक यांनी सांगितले व पालकांना त्यांचा गर्भातीलचं चार महिन्यांचा बाळ गमवावा लागला.
          या घटनेने संपूर्ण गाव हादरले असून गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. तर, या सर्व घटनेला सर्वस्वी जवाबदार असलेल्या, प्रकल्प अधिकारी कु. परसमोडे, कनिष्ठ अधिकारी श्री. एल. पी. अतकरी व अपात्र उमेदवार कु. वर्षा पंढरी लांजेवार हे कारणीभूत असून त्यांनी मृत बालकांच्या कुटुंबाची वैद्यकीय नुकसान भरपाई देण्याचा दावा ठोकला व या तिन्ही आरोपींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी वाढवे कुटुंबीय व शंकरपुर ग्रामवासीयांनी केली आहे.
Back to top button