📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

तालुकाध्यक्ष गणेश बजगुडे पाटील यांच्या नेतृत्वात बीड तालुक्यात काँग्रेसच्या गाव तिथे शाखा अभियानास सुरुवात

तालुकाध्यक्ष गणेश बजगुडे पाटील यांच्या नेतृत्वात बीड तालुक्यात काँग्रेसच्या गाव तिथे शाखा अभियानास सुरुवात
येणाऱ्या सर्व निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार – राहुल सोनवणे
शेतकरी कष्टकऱ्याच्या न्यायहक्कासाठी काँग्रेस कटिबद्ध – गणेश बजगुडे पाटील
बीड :- महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असताना काँग्रेस पक्ष स्वबळाचा नारा देत बीड तालुक्यात पक्ष संघटन मजबुत करण्यासाठी तालुकाध्यक्ष गणेश बजगुडे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज बीड तालुक्यात मंजेरी हवेली, बाबामिया इनामदार नगर, तेलगाव रोड येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्या शाखेचे उद्घाटन जिल्हाध्यक्ष राहुल भैया सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी योगेश गंगाराम बहिरवाल, राजु मुसा शेख, रिजवान पठाण, रेवण खटाने, राजेंद्र घोशीर, संतोष बेदरे, इरफान इनामदार, मोहसीन सय्यद, अमीर इनामदार, आरशान इनामदार, अलीम मोमिन, अन्सार बेग, अखिल शेख, अतिक पठाण वाजेद शेख

यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी तालुकाध्यक्ष गणेश बजगुडे पाटील यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी शेख कादर बाबामिया इनामदार यांची बीड तालुका उपाध्यक्ष पदी फेर निवड करण्यात आली असुन त्याच बरोबर पाली सर्कल प्रमुख पदी योगेश गंगाराम बहिरवाल यांची निवड करण्यात आली.

     गणेश बजगुडे पाटील यांचा राजकीय अनुभव, संघटनात्मक कौशल्य व तालुक्यातील वाडी वस्ती तांड्यापर्यंत असलेला प्रत्यक्ष लोकसंपर्क यामुळे तालुक्यात काँग्रेस पक्षाला पुन्हा एकदा नवसंजीवनी निर्माण होवुन येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार विजयी होऊ शकतो.
     यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल भैया सोनवणे म्हणाले की, बीड जिल्हा हा काँग्रेस विचाराचा जिल्हा असुन बीड जिल्ह्यात काँग्रेस पक्षाचा मोठा मतदार आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत आघाडीचे उमेदवार विजयी करण्यात काँग्रेसचा मोठा वाटा आहे परंतु आघाडीच्या राजकारणात काँग्रेसला नेहमीच दुय्यम स्थान मिळाले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात खासदार रजनीताई पाटील, माजी मंत्री अशोकराव पाटील साहेब व प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष स्वतंत्र निवडणूक लढवणार असुन सर्वसामान्य कार्यकर्त्यांना लढण्याची संधी व बळ दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तालुकाध्यक्ष गणेश बजगुडे पाटील म्हणाले की, बीड तालुक्यात काँग्रेसने अनेकाना मोठे केले परंतु ते स्वतःच्या स्वार्थासाठी पक्ष सोडून गेले परंतु जनता मात्र आजही काँग्रेस सोबत आहे. सर्वसामान्य शेतकरी, कष्टकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी काँग्रेस पक्ष व आम्ही सर्व कटिबद्ध असुन येणाऱ्या काळात जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने काँग्रेस पक्ष बीड तालुक्यात पुन्हा मजबुत दिसेल असेही ते म्हणाले यावेळी बीड तालुक्यातील मंजेरी हवेली, तेलगाव रोड येथील बाबामिया इनामदार नगर याठिकाणी शाखेचे उद्घाटन करुन गाव तिथे शाखा अभियानास सुरुवात करण्यात आली. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल भैय्या सोनवणे, तालुकाध्यक्ष गणेश दादा बजगुडे पाटील, सरपंच संतोष सोनवणे, तालुका उपाध्यक्ष शेख कादर बाबामिया इनामदार, पाली सर्कल प्रमुख योगेश बहिरवाल, मंजेरी हवेली शाखा प्रमुख राजु शेख, उपाध्यक्ष रेवण खटाने, सचिव बाबासाहेब बहिरवाल, सहसचिव रिजवान पठाण, कोषाध्यक्ष राजेंद्र घोषिर, संघटक संतोष बेदरे, बाबामिया इनामदार नगर शाखेचे अध्यक्ष इरफान इनामदार, उपाध्यक्ष मोहसीन सय्यद, सचिव अमीर इनामदार, सहसचिव आरशान इनामदार, यांच्यासह रणजीत शेळके, भैय्या गोरे, ओम नवले, शेख शफीक आदी उपस्थित होते.
Back to top button