मुंबई

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना जीवे मारण्याची धमकी

 

राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांच्या संदर्भात एक धक्कदायक माहिती समोर येत आहे. नवाब मालिक यांना धमकीचा फोन आल्याची माहिती समोर आली आहे. या वृत्तामुळे राजकीय वर्तुळात एकाच खळबळ उडाली आहे. नवाब मलिक यांच्या कुर्ला येथील कार्यालयात सकाळी हा फोन आला असल्याची माहिती आहे.

हा फोन राजस्थानमधून केला गेला असून सुरेश हुडा असे धमकी देणाऱ्या व्यक्तीचे नाव असल्याची माहिती आहे. फोन करणाऱ्या व्यक्तीने समीर वानखेडे चांगले काम करत असून त्यांना अडथळा निर्माण करू नका, अन्यथा याचे परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी त्यांनी मंत्री महोदयांना दिली आहे.

मलिक यांनी शुक्रवारी दावा केला की त्यांना धमकीचा फोन आला होता ज्यात एका व्यक्तीने त्यांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना लक्ष्य करू नका असा इशारा दिला होता. मुंबई ड्रग बस्ट प्रकरणात समीर वानखेडेवर हल्ला करणार्‍या राष्ट्रवादीच्या नेत्यानेही नंतर कुटुंबाला लक्ष्य केले होते. यावरूनच तयांना धमाचे फोन आले असल्याचे बोलले जात आहे.

Back to top button